….तर त्यात बापाची काय चूक? दहशतवाद्याचं घर पाडण्यास फारूख अब्दुल्लांचा विरोध

Farooq Abdullah : पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terrorist attack) संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. यातच माजी मुख्यमंत्री तथा जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी या हल्ल्याचा निषेध केला. लोकांना दहशतवादाविरुद्ध (Terrorism) एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केलं. मात्र, दहशतवाद्याचं घर पाडण्यास फारूख अब्दुल्लांनी विरोध केला.
Ajit Pawar Vs Sharad Pawar: ‘अजितदादां’कडे आमदार-खासदारांचा ओढा, काकांची मात्र कसोटी ?
पहलमाम दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड आदिल हुसैन असल्याचं बोलल्या जातं. तो पाकिस्तानमध्ये गेला होता. तिथं त्याने लष्कर ए तैयबाकडून प्रशिक्षण घेतले होत. आणि नंतर पहलमाम दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचं सुरक्षा दलांनी सांगितलं. सुरक्षा दलाने त्याचं घरही पाडून टाकलं. दरम्यान, यावर बोलताना अब्दुल्ला म्हणाले एखाद्या बापाचा मुलगा अमृतसरला जायचं सांगून पाकिस्तानमध्ये जात असेल तर त्या बापाला काय माहिती असणार मुलगा पाकिस्तानला गेलाय? ते घर त्या बापानं बांधलेलं असतं. आपण त्या बापाने बांधलेलं घर पाडतो, तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांवरही होत असतो. हे मी माणूसकीच्या नात्यानं सांगतोय. भारताची एकता अडचणीत येईल असं काहीही करून नका, असं अब्दुल्ला म्हणाले.
विचार करा! जगात दरवर्षी होतेय 105 कोटी टन अन्नाची नासाडी; ‘या’ देशात सर्वाधिक अन्न वाया
यावेळी फारुख अब्दुल्ला यांनी सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या भूमिकेवरही भाष्य केले. ते म्हणाले, या करारात बऱ्याच काळापासून सुधारणा करणं गरजेचं होतं. आपण नद्यांच्या पाण्यापासून वंचित आहोत. नद्यांवर जलविद्युत निर्मितीच्या मदतीने हजारो मेगावॅट वीज निर्माण करता येते. पण पाकिस्तानच्या परवानगीशिवाय हे करता येणार नाही. भारत हा महात्मा गांधींचा देश आहे, आम्ही पाण्याबाबत पाकिस्तानला निश्चितच धमकी दिली आहे. पण त्यांना मारणार नाही. आपण इतके क्रूर नाही, जेव्हा दोन्ही देशांमध्ये सिंधू पाणी करार झाला तेव्हा जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळं आजही लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कोण आहे आदिल हुसैन?
अनंतनागमधील सरकारी पदवी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर आदिलने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलं. आदिलचं कुटुंब साधं जीवन जगते. त्याचा एक भाऊ पेंटरचं काम करतो, दुसरा भाऊ एका ऑटोमोबाईल शोरूममध्ये काम करतो. गुप्तचर यंत्रणांची माहीत आहे की, आदिल अभ्यास व्हिसावर पाकिस्तानला गेला होता. येथे तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आला. त्याने पाकिस्तानमधील लष्कर ए तैयबाकडून प्रशिक्षण घेतले आणि तो देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाला. दरम्यान, सहा वर्षांनी म्हणजे, २०२४ मध्ये आदिल नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून भारतात परतल्याचे मानले जातंय.