विचार करा! जगात दरवर्षी होतेय 105 कोटी टन अन्नाची नासाडी; ‘या’ देशात सर्वाधिक अन्न वाया

Top Countries Food Waste : जगभरात किती अन्न फेकून दिले जात आहे याचा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. United Nations Food Waste Index Report 2024 अहवालात धक्कादायक माहिती नमूद करण्यात आली आहे. दरवर्षी खाद्य उत्पादनातील तब्बल 19 टक्के खाद्य वाया जात आहे. 105.2 कोटी टन इतके अन्न दरवर्षी वाया जात आहे. दुसरीकडे जगात कोट्यावधी लोकांना अन्न मिळत नाही. त्यांना उपाशीपोटी दिवस काढावे लागत आहेत. आज याच निमित्ताने जाणून घेऊ की जगात नेमके किती देश कुपोषित आहेत? किती लोक उपासमारीच्या संकटाला तोंड देत आहेत? जगात कोणत्या देशात सर्वाधिक अन्न वाया जात आहे?
ग्लोबल हंगर इंडेक्समधील 125 देशांच्या (Global Hunger Index) यादीत भारताला 111 वा क्रमांक मिळाला आहे. म्हणजेच देशात आजही अनेक लोकांना पुरेशा पोषक घटकांनी युक्त अन्न मिळत नाही हे स्पष्ट आहे. जगभरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात अन्न वाया जात आहे. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने स्टॉप फूड वेस्ट डे आयोजित केला जातो.
देशात किती लोक कुपोषित
कुपोषण ही जगातील एक मोठी समस्या आहे. लोकांना पोषक घटकांनी युक्त अन्न मिळत नसल्याने कुपोषणाची समस्या निर्माण होते. देशात आजमितीस 100 कोटी लोकांना पोषक घटकांनी युक्त आहार मिळत नाही. देशात कुपोषण आणि अन्नाची कमतरता या दोन्ही समस्या गंभीर श्रेणीत आहेत. भारतात 23.4 कोटी लोक कुपोषणाच्या समस्येने पीडित आहेत. आज जगात इतके अन्न वाया जात आहे की त्यातील एक चतुर्थांश अन्न जरी मिळाले तरी 795 मिलियन कुपोषित लोकांना चांगले अन्न उपलब्ध करून देता येईल.
भारताचा वॉटर स्ट्राइक! बगलिहार धरणातून रोखले चिनाब नदीचे पाणी; पाकिस्तानला जबर दणका
दर दिवसाला 100 कोटी थाळी वाया
युनायटेड नेशन्स फूड इंडेक्स रिपोर्टनुसार दरवर्षी एकूण खाद्य उत्पादनाच्या 19 टक्के खाद्य वाया जात आहे. तर दुसरीकडे जगात जवळपास 78.3 कोटी लोक उपाशीपोटी दिवस कंठीत आहेत. जगातील प्रत्येक व्यक्ती दरवर्षी 79 किलो अन्न वाया घालवत आहे. म्हणजेच दर दिवशी 100 कोटी थाळी अन्न वाया जाण्याचे समान आहे. जगात आज इतक्या मोठ्या प्रमाणात अन्न वाया जात आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
नायजेरियात प्रती व्यक्ती 113 किलो अन्नाची नासाडी
आफ्रिकेतील देशांसमोर अन्न टंचाईचे मोठे संकट आहे. या देशांत खाद्य पदार्थांची कायम समस्या असते. पण येथेच नायजेरिया सारखा देशही आहे जेथील प्रत्येक व्यक्ती दरवर्षी 113 किलो अन्न वाया घालवत आहे. इजिप्तमधील प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सरासरी 163 किलो अन्न वाया घालवत आहे. टांझानियामध्ये हा आकडा 112 किलो तर रवांडामध्ये 141 किलो आहे. प्रति व्यक्ती फूड वेस्टच्या यादीत मालदीव (Maldives) अव्वल आहे. या देशात प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सरासरी 207 किलो अन्न वाया घालवत आहे. सिरिया आणि ट्युनिशिया देशांत हा आकडा 172 किलो तर पाकिस्तानात 130 किलो आहे. रशियात हा आकडा 33 किलो तर फिलिपिन्समध्ये प्रत्येक व्यक्ती दरवर्षी 26 किलो अन्न वाया घालवत आहे.
तुम्हीही खाताय व्हायरल दुबई चॉकलेट? निर्माण होऊ शकतो लिव्हर डॅमेज ते कॅन्सरपर्यंतचा धोका