IND vs WI : नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी घेतला निर्णय, रोहित, विराट संघाबाहेर

IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज दुसरा सामना आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती मिळाली आहे. तर हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. ब्रिजटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 5 गडी राखून […]

WhatsApp Image 2023 07 29 At 6.57.10 PM

WhatsApp Image 2023 07 29 At 6.57.10 PM

IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज दुसरा सामना आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती मिळाली आहे. तर हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. ब्रिजटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 5 गडी राखून विजय मिळवला. त्या सामन्यात जडेजा-कुलदीपच्या घातक गोलंदाजीसमोर कॅरेबियन फलंदाज हतबल दिसले आणि संपूर्ण संघ 114 धावांत गारद झाला. आता दुसरी वनडे जिंकून भारतीय संघाला मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेण्याची संधी आहे. (West Indies won the toss and decided to bowl first, Rohit, Virat out of the team)

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रॅंडन किंग, काइल मेयर्स, अॅलिक अथानाझ, शाई होप (विकेटकीपर, कर्णधार ), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कारिया, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स

Asia Champion कुस्ती स्पर्धेत जामखेड गाजलं; सुजय तनपुरेला सुवर्णपदक

भारताची प्लेइंग इलेव्हन: शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार ), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार

 

Exit mobile version