Prize Money Comparison For Grand Slam And IPL Winner: क्रीडा जगतात अशा काही घटना आहेत ज्यात विजेत्याला मिळणारी रक्कम इतर स्पर्धांपेक्षा जास्त आहे. जगातील प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील विजेत्याला मिळालेली बक्षीस रक्कम पाहिली तर ती इतर स्पर्धांपेक्षा जास्त असेते. विम्बल्डन 2023 मध्ये बक्षिसाच्या रकमेतही यावेळी 11 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे, क्रिकेटमध्ये आयपीएल आणि विश्वचषक विजेत्यांना मिळालेल्या पैशांच्या तुलनेत ते खूप जास आहे. (What is the prize money of Grand Slam compared to World Cup and IPL titles?)
विम्बल्डन 2023 मध्ये, 20 वर्षीय कार्लोस अल्काराझने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचचा पराभव करून विजेतेपद पटकावले. विजयानंतर अल्काराजला बक्षीस म्हणून सुमारे 25 कोटी रुपये मिळाले. त्याचवेळी उपविजेता ठरलेल्या नोव्हाक जोकोविचलाही 12.25 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) सीझन 2023 मध्ये, जेव्हा चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने विजेतेपद पटकावले, तेव्हा त्यांना एकूण 20 कोटी रुपये मिळाले होते, जे संपूर्ण संघामध्ये वितरित करण्यात आले. त्याचवेळी उपविजेत्या गुजरात टायटन्सला 13 कोटी रुपये देण्यात आले. 2022 मध्ये झालेल्या T20 विश्वचषकात इंग्लंडला विजेते म्हणून 13.05 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले होते, तर पाकिस्तानला उपविजेते म्हणून 6.5 कोटी रुपये देण्यात आले होते.
ऑस्ट्रेलियन ओपन आणि यूएस ओपनमध्येही मोठी बक्षीस रक्कम
विम्बल्डन व्यतिरिक्त, 3 इतर मोठ्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा वर्षात आयोजित केल्या जातात. यामध्येही बक्षिसाची रक्कम देखील खूप अधिक असते. गेल्या वर्षी यूएस ओपनमध्ये एकेरी स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूला 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते. याशिवाय, ऑस्ट्रेलियन ओपन 2023 मधील सिंगल इव्हेंटच्या विजेत्याला 16.73 कोटी रुपयांपेक्षा जास्त तर फ्रेंच ओपन 2023 मधील सिंगल इव्हेंटच्या विजेत्याला 20.58 कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षीस रक्कम देण्यात आली.