आगरकरांची मुख्य निवडकर्ता म्हणून शेवटची बैठक; रोहित शर्मा अन् विराट कोहलीबाबत होणार मोठा निर्णय?

Ajit Agarkar : वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी आज भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे मुख्य

Ajit Agarkar

Ajit Agarkar

Ajit Agarkar : वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी आज भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांची आज शेवटची बैठक होऊ शकते. या बैठकीत भारतीय संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीवर (Virat Kohli) मोठा निर्णय होण्याची देखील शक्यता आहे. आज मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि यानंतर ते या पदावर कायम राहण्याची शक्यता फार कमी असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.

निवडकर्त्यांची बैठक कधी होणार?

निवडकर्त्यांची बैठक सायंकाळी 6 नंतर होणार आहे. या बैठकीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघाची निवड केली जाईल. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या संघाचीही घोषणा केली जाईल. तसेच विश्वचषक 2027 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली असणार की नाही याबाबत देखील आज मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अजित आगरकर मुख्य निवडकर्ता पदावरून पायउतार होणार?

माजी क्रिकेटपटू अजित आगरकर (Ajit Agarkar) जुलै 2023 मध्ये चेतन शर्मा यांच्या जागी भारताचे मुख्य निवडकर्ता बनले होते. जूनमध्ये त्यांचा करार नूतनीकरण करण्यात आला असला तरी, आता ते या पदावरून पायउतार होण्याचा विचार करत आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, ही आगरकर यांची शेवटची बैठक असू शकते. निवड समितीच्या अध्यक्षांनी बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांच्यासाठी आभार मानणारे पत्रही तयार केल्याचे समजते.

अजित आगरकर बैठकीसाठी दिल्लीत असतील आणि त्यांचा करार 2027 च्या वनडे विश्वचषकापर्यंत (World Cup 2027) वाढवला जाईल का, यावर ते बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. आगरकर बीसीसीआयच्या अलीकडील आढावा बैठकीला उपस्थित राहिले नव्हते, ज्यामुळे ते मुख्य निवडकर्ता (चीफ सिलेक्टर) पदावरून पायउतार होऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

आरक्षणासाठी प्रयत्न करणारे फडणवीस वाईट कसे? चंद्रकांत पाटलांचा जरांगेंवर हल्लाबोल-

आज संघाची घोषणा होण्याची शक्यता

भारत वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वनडे आणि पाच टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी20 मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे आणि यासाठी निवडला जाणारा संघच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, 50 षटकांच्या फॉरमॅटसाठी संघाची निवड करताना अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

Exit mobile version