Download App

Hockey World Cup 2023: भारत विश्वचषकातून बाहेर, न्यूझीलंडने सामना जिंकला

  • Written By: Last Updated:

भुवनेश्वर :भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हॉकी विश्वचषक 2023 (Hockey World Cup 2023) स्पर्धेतील क्रॉसओव्हर सामना अत्यंत चुरशी झाला. या चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करीत शूटआऊटमध्ये विजय मिळवला आहे.

भुवनेश्वर येथे खेळल्या जात असलेल्या 2023 हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

पहिल्या चार क्वार्टरमध्ये म्हणजेच सामन्याच्या निर्धारित वेळेत सामना 3-3 असा बरोबरीत होता. पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही.

यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने 2 तर न्यूझीलंडने 1 गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारत आणि न्यूझीलंडने 1-1 गोल केला. यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने 1 गोल केला. अशाप्रकारे हा सामना निर्धारित वेळेत 3-3 असा बरोबरीत सुटला.

यानंतर नियमाप्रमाणे सामन्याचा निकाल हा शूटआऊटने घेतला जाणार होता. शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने 5-4 असा विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंड संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ 24 जानेवारीला गतविजेत्या बेल्जियमशी पडेल.

Tags

follow us