Download App

Woman T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेची फायनलमध्ये धडक; बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारली

2009 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनलमध्ये खेळणार नाही. उद्या वेस्टइंडीज आणि न्यूझीलंडमध्ये उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार आहे. या लढतीत विजेता दक्षिण आफ्रिकेबरोबर लढणार आहे.

  • Written By: Last Updated:

Australia vs South Africa : महिला वर्ल्डकपमध्ये (Woman T20 World Cup) दक्षिण आफ्रिकेने जबरदस्त कामगिरी केली आहे. उपांत्यफेरीत दक्षिण आफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा आठ विकेटने पराभव करत फायनलमध्ये(Australia vs South Africa) धडक मारली आहे. 2015 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनलमध्ये खेळणार नाही. उद्या वेस्टइंडीज आणि न्यूझीलंडमध्ये उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार आहे. या लढतीत विजेता दक्षिण आफ्रिकेबरोबर लढणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचे एनेके बोश हिने नाबाद 74 धावांची खेळी केली. या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाचा वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्ल्डकप फायनल झाली होती. ही लढत ऑस्ट्रेलियाने 19 धावांनी जिंकली होती. याच पराभवाचा बदला आता दक्षिण आफ्रिकेने घेतला आहे.

बोशने आठ चौकार आणि एक षटकार मारत 48 चेंडूत अर्धशतक झळकविले आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेले 135 धावांची लक्ष्य आफ्रिकेने 17.2 षटकांमध्ये गाठले आहे. आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वोलवार्ट (42 धावा) आणि बोशने दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागिदारी केली. या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया आठव्यांदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये गेली आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 134 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून विकेटकीपर बेथ मुनी हिने सर्वाधिक 44, कर्णधार तहलिया मॅकग्राने 27 धावांची खेळी केली. तर अॅलिस पॅरीसने 23 चेंडूत 31 धावांची खेळी केली.

follow us

संबंधित बातम्या