Download App

Maharashtra Kesari : महाराष्ट्रात पहिल्यांदाच रंगणार महिलांच्या महाराष्ट्र कुस्तीचा थरार

Maharashtra Kesari : महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने  याची घोषणा  केली आहे. या महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार सांगली येथे रंगणार आहे. 23 आणि 24 मार्च रोजी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदाच सर्वांना महिलांची कुस्ती पहायला मिळणार आहे.

पुण्यामध्ये आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची पत्रकार परिषद झाली. यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि पुणे शहर कुस्तीगीर परिषेदचे अध्यक्ष अमोल बराटे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

IND vs AUS 4th Test: अहमदाबाद कसोटी अनिर्णित: भारताने सलग चौथी मालिका जिंकली, अशी कामगिरी करणारा पहिला संघ ठरला

महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही सांगली येथे होणार आहे. 23 व 24 मार्च 2023 रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. यासाठी खास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहितेंनी दिली आहे.

गद्दार सत्तार हाय हाय… विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधकांची घोषणाबाजी

या स्पर्धेमध्ये खुल्या वजनी गटासह खुल्या गटांतील महिला या कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहे .या स्पर्धेत 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 किलो वजनी गटातील महिला पैलवान सहभागी होणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी 65 किलो वजनीगटावरील पैलवान ही कुस्ती लढणार आहे. या स्पर्धेत 45 जिल्ह्यांचे  संघ सहभागी होणार असून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील महिला केसरी खिताबास चांदीची गदा देऊन त्याचा सत्कार करण्यात येणार आहे.

Tags

follow us