Women’s T20 World Cup 2026 : आयपीएलनंतर आता सर्वजण महिलांच्या टी20 विश्वचषकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयसीसीची ही स्पर्धा 12 जूनपासून सुरु होणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना 5 जुलै रोजी खेळला जाणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या या विश्वचषकात 12 संघ सहभागी होणार असून एकूण 33 सामने खेळले जाणार आहे.
आयसीसीने (ICC) दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेसाठी 12 संघांना दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. 14 जून रोजी भारतीय संघ आपला पहिला सामना या स्पर्धेत खेळणार आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. भारतीय संघ ग्रुप ए मध्ये असून ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड्स आणि स्कॉटलंड या संघांचा देखील समावेश या ग्रुपमध्ये आहे. तर ग्रुप बी मध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे.
भारतीय संघ 14 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध, 17 जून रोजी नेदरलँडविरुद्ध, 21 जून रोजी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध, 25 जून रोजी बांगलादेशविरुद्ध आणि 28 जून रोजी या स्पर्धेत शेवटचा ग्रुप सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
2026 च्या महिला T20 विश्वचषकाचे सामने इंग्लंड आणि वेल्समधील सात वेगवेगळ्या मैदानांवर खेळले जातील. या स्थळांमध्ये लॉर्ड्स, द ओव्हल, एजबास्टन, ओल्ड ट्रॅफर्ड, हेडिंगली, द रोझ बाऊल आणि ब्रिस्टल काउंटी ग्राउंड यांचा समावेश आहे. अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला जाईल.
लंकेंसह काँग्रेसच्या चव्हाणांची माघार…, तनपुरेंसाठी आघाडीचा छुपा डाव ?
भारतीय संघाचे वेळापत्रक
14 जून – भारत विरुद्ध पाकिस्तान
17 जून – भारत विरुद्ध नेदरलँड्स
21 जून – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
25 जून – भारत विरुद्ध बांगलादेश
28 जून – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
