World Athletics Championships : देशाची मान उंचावली! पाकिस्तानला हरवत नीरज चोप्राची ‘सुवर्ण’ कमाई

World Athletics Championships : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप (World Athletics Championships) स्पर्धा हंगेरीतील बुडापेस्ट येथे सुरू आहे. यामध्ये भारताच्या प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तानला हरवत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने 88.17 मीटरपर्यंत भालाफेक केली. तर पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकवर राहिला. त्याला या स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे […]

Neeraj Chopra

Neeraj Chopra

World Athletics Championships : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप (World Athletics Championships) स्पर्धा हंगेरीतील बुडापेस्ट येथे सुरू आहे. यामध्ये भारताच्या प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तानला हरवत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने 88.17 मीटरपर्यंत भालाफेक केली. तर पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकवर राहिला. त्याला या स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

कोटा येथे आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या, लातूरच्या तरुणाने कोचिंग सेंटरच्या इमारतीवरुन उडी

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप (World Athletics Championships) स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने (Neeraj Chopra) केलेल्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर दुसऱ्या फेरीनंतर 88.17 मीटरसह अव्वल ठरला. तेव्हाच जर्मनीचा ज्युलियन वेबर दुसऱ्या फेरीत 85.79 मीटर भाला फेकत दुसरा आला. तर झेक प्रजासत्ताकचा जेकोब वडलेच 84.18 मीटरसह तिसऱ्या क्रमांकावर होता. तर तिसऱ्या फेरीमध्ये नीरजने 86.32 मीटर अंतर कापले. तर पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद 87.82 दुसऱ्या क्रमांकवर आला.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात पुण्याचा डंका! मृणाल गांजाळे यांनी कोरले नाव…

या अगोदर नीरजने (Neeraj Chopra) डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तर 2020 साली त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत भालापेक याच प्रकारात पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची ती ऐतिहासिक कामगिरी ठरली होती. तर आता पुन्हा त्याने हंगेरीतील बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप (World Athletics Championships) स्पर्धेत पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Exit mobile version