Download App

WC 1996 : श्रीलंकेकडून भारताचा पराभव प्रेक्षकांच्या जिव्हारी; गोंधळ घालत पेटवलं होतं स्टेडियम

World Cup 1996 : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्ड कपचा (ODI World Cup)थरार सुरु होणार आहे. टीम इंडियानं आत्तापर्यंत दोनवेळा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. भारतीय संघानं पहिल्यांदा 1983 मध्ये आणि दुसरा 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकला. पण टीम इंडियानं 1996 (World Cup 1996)मध्ये तीसरा वर्ल्डकप जिंकण्याची संधी गमावली होती.

भारतीय क्रिकेटप्रेमींनी घातलेल्या गोंधळानंतर टीम इंडियाला मोठी नामुष्की सहन करावी लागली होती. खरंतर, 1996 च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमने श्रीलंकेविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळला होता, त्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा(Team India) खराब परफॉर्म पाहून भारतीय क्रिकेटप्रेमींनी स्टेडियममध्ये प्रचंड गोंधळ घातला. यावेळी नेमकं काय घडलं होतं? काय परिस्थिती झाली होती? अन् त्याचा परिणाम काय झाला? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

Asian Games 2023: हॉकीमध्ये बांग्लादेशचा धुव्वा, टीम इंडिया उपांत्य फेरीत

झालं असं की, (World Cup 1996) भारत-पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यानंतर हा सामना झाला. पाकिस्तानबरोबर झालेल्या सामन्यात टीम इंडियाने जोश दाखवला. टीम इंडियाने पाकिस्तानला बेंगळुरूमध्ये पराभूत केलं. या सामन्यानंतर जणू काही टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यासारखं वातावरण झालं. श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळण्याआधी टीम इंडिया फायनलमध्ये जाऊन वर्ल्डकप चॅम्पियन बनणार असाच फिव्हर भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये होता.

Bihar Caste Survey Results : जातीनिहाय जनगणना अन् कास्ट; बिहार सर्व्हेची संपूर्ण ABCD

पुढे टीम इंडिया आणि श्रीलंकन क्रिकेट टीम यांच्यातील हा उपांत्य सामना 13 मार्च 1996 रोजी खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकन टीमने प्रथम फलंदाजी करुन 50 षटकांमध्ये 8 विकेट गमावून 251 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने पहिली विकेट पहिल्या 8 धावांवर आणि दुसरी विकेट सचिन तेंडुलकरच्या रूपाने 98 धावांवर गमावली. यानंतर टीम इंडियाने 120 धावांवर 8 विकेट गमावल्या. टीम इंडियाची अशी झालेली अवस्था पाहून स्टेडियममधील क्रिकेटप्रेमींचा पारा चढला.

श्रीलंकेच्या टीमसमोर संपूर्ण इंडियन टीम ज्या पद्धतीने विखुरली त्यामुळे तर क्रिकटप्रेमींचा संताप अधिकच वाढला. काही चाहत्यांचा असाही विश्वास होता की हे मैदान मायदेशातले आहे, त्यामुळे टीम इंडियाला त्याचा चांगला फायदा होईल पण भलतच घडलं.

टीम इंडियाला पराभवाच्या मार्गावर जाताना पाहून क्रिकेटप्रेमी संतापले. रागावलेल्या क्रिकेटप्रेमींनी स्टेडियममध्ये गोंधळ घातला. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात होता. चाहत्यांनी मैदानावर बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. स्टेडियममधील संपूर्ण वातावरण बिघडलं होतं, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. सगळीकडे धावपळ सुरु झाली. क्रिकेटप्रेमींमध्ये रोष इतका टोकाला पोहोचला की, अक्षरशः त्यांनी स्टेडियममधील खुर्च्या पेटवल्या.

स्टेडियममध्ये निर्माण झालेल्या गोंधळामुळे सामना त्या ठिकाणी थांबवण्यात आला. दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला फक्त 34.1 षटकेच खेळता आली. सामना थांबवल्यानंतर आणि भारतीय क्रिकेटप्रेमींचा रोष पाहून रेफ्री क्लाइव्ह लॉईड यांनी या सामन्यात श्रीलंकेला विजयी घोषित केलं. अशा प्रकारे टीम इंडिया वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचमध्ये हरली.

टीम इंडियाविरुद्ध विजयी घोषित झालेल्या श्रीलंकेच्या संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागला. अंतिम सामना पाकिस्तानमधील लाहोरमध्ये खेळला गेला. त्यामध्ये श्रीलंकेनं 22 बॉल बाकी असताना 7 विकेट्स राखून विजेतेपद पटकावलं.

Tags

follow us