Download App

World Cup 2023 : 6 मिनिटांच्या उशीरानंतरही गांगुली वाचला; 16 वर्षांपूर्वी काय घडलं?

World Cup 2023 : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सध्या (World Cup 2023) ज्या एका प्रसंगाची जोरदार चर्चा सुरू आहे तो प्रसंग श्रीलंकेचा खेळाडू अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याच्याशी संबंधित आहे. फलंदाजी करण्यासाठी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतल्याने पंचांनी त्याला टाइम आऊट दिले. क्रिकेटच्या इतिहासात अशा पद्धतीने बाद होणारा मॅथ्यूज हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. श्रीलंकेच्या पराभवापेक्षा (IND vs SL) त्याच्या अशा पद्धतीने बाद होण्याचीच जास्त चर्चा रंगली आहे. मात्र, याआधीही क्रिकेटच्या इतिहासात असा एक प्रसंग घडला होता. मात्र, त्यावेळी सौरभ गांगुली (Saurabh Ganguly) बाद झाला नाही. सौरभ गांगुलीलाही मैदानात येण्यास दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला होता. तरी देखील तो बाद झाला नाही. नेमका हा चमत्कार कसा घडला ते आता जाणून घेऊ या..

हा प्रसंग होता 2007 मधील. त्यावेळी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होती. आफ्रिकेतील केपटाऊन शहरात दोन्ही संघांदरम्यान कसोटी सामना खेळला जात होता. त्या सामन्याच्या चौथ्या दिवशी वसीम जाफर आणि वीरेंद्र सहवाग दोघे बाद झाले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी येणार होता. मात्र, तो काही काळ बाहेर राहिल्याने फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. त्याचवेळी व्हीव्हीएस लक्ष्मणही अंघोळ करत होता आणि गांगुली ट्रॅकसुटमध्ये फिरत होता. मग काय त्यालाच फलंदाजीसाठी झटपट तयार होण्यास सांगितले गेले. तयार होऊन मैदानात येईपर्यंत सहा मिनिटे उशीर झाला होता.

World Cup 2023 : अफगाणिस्तान की पाकिस्तान, सेमी फायनलमध्ये कोण? आजच फैसला

नियम पाहिला तर त्याला आधीचा खेळाडू बाद झाल्यानंतर पुढच्या दोन मिनिटात मैदानात जाऊन फलंदाजी करायची होती. मात्र दादा सहा मिनिटे उशीराने मैदानात पोहोचला होता. आफ्रिकेच्या खेळाडूंनी पंचांकडे अपील केले असते तर गांगुली निश्चितच बाद झाला असता. पण, तसे काहीच घडले नाही. गांगुली सहा मिनिटांच्या विलंबाने मैदानात आला तेव्हा पंचांनी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथला सर्व प्रकरण समजावून सांगितले होते. त्याच दरम्यान स्मिथनेही वेळ काढण्याबाबत अपील केले नव्हते. त्याने आत्मा जपला आणि गांगुलीला वेळ काढू दिला नाही. अशा प्रकारे या सामन्यात गांगुली बाद होता होता वाचला.

मॅथ्यूजच्या बाबतीत नेमकं काय घडलं ?

कालच्या श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश सामन्यात समरविक्रमा झेलबाद झाल्यानंतर मॅथ्यूज क्रीजवर आला. मात्र मॅथ्यूज चुकीचे हेल्मेट घालून मैदानात पोहोचला होता. यानंतर त्याने योग्य हेल्मेट मागवून घेतले. मात्र या सगळ्या गोष्टीला 2 मिनिटांपेक्षा अधिक वेळ झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाजाने दुखापतीमुळे मैदान सोडल्यानंतर पुढच्या फलंदाजाने दोन मिनिटांच्या आत पुढील बॉल खेळण्यासाठी येणे आवश्यक असते. जर दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाला तर त्या खेळाडूला ‘टाईम आऊट’ ठरवले जाते.

World Cup 2023 : विजय टीम इंडियाचा पण, पाकिस्तान हॅपी; सेमी फायनलचं गणित जुळणार ?

श्रीलंका सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर

बांग्लादेश, इंग्लंडनंतर आता श्रीलंकाही वर्ल्डकपच्या सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाने सेमीफायनलचे तिकीट मिळविले आहे. आता पाच संघ सेमीफायनलच्या दोन जागांसाठी लढणार आहे. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाची दावेदारी पक्की मानली जात आहे. तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेदरलँड संघही शर्यतीत आहे. परंतु जर-तर परिस्थितीवर या संघाचे नशिब आहे.

Tags

follow us