Download App

World Cup 2023: अश्विनने केले विश्वचषकाचे तिकीट पक्के? अक्षर किंवा शार्दुलला डच्चू निश्चित

World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. अश्विननेही आपल्या गोलंदाजीने संघ व्यवस्थापनाला निराश केले नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अश्विनने 10 षटकात 47 धावा देत 1 बळी घेतला. यानंतर इंदूर वनडेमध्ये अश्विनने 7 षटकांत 41 धावांत 3 खेळाडू बाद केले. विशेषत: डेव्हिड वॉर्नरसह डाव्या हाताचे फलंदाज अश्विनच्या गोलंदाजीसमोर संघर्ष करताना दिसले.

अश्विनची विश्वचषकात एन्ट्री
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चांगली गोलंदाजी केल्यानंतर अश्विनने विश्वचषकासाठी आपले स्थान निश्चित केले आहे अशी चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कपच्या टीममध्ये अश्विन नव्हता. यानंतर जखमी अक्षर पटेलच्या जागी अश्विनचा ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेसाठी टीम इंडियात समावेश करण्यात आला होता.

आकडेवारी दर्शवते की अश्विन हा डाव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध अत्यंत प्रभावी पर्याय ठरत आहे. त्याचबरोबर कुलदीप यादवला स्पिनर म्हणून भारताच्या विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा संघात असेल. मात्र अक्षर पटेलच्या फिटनेसवर प्रश्न कायम आहेत.

Farrey teaser released : सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री करतेय डेब्यू, टीझर रिलीज

अक्षर पटेल किंवा शार्दुलला डच्चू मिळू शकतो का?
वर्ल्डकपसाठी भारतीय संघात एकही ऑफस्पिनर नाही. अशा परिस्थितीत ऑफस्पिनर म्हणून संघ व्यवस्थापनासमोर अश्विन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे अश्विनची विश्वचषकाच्या संघात निवड होण्याची शक्यता आहे. अश्विन खेळला तर अक्षर पटेल किंवा शार्दुल ठाकूर यांना संघातून डच्चू मिळू शकतो. अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांच्यापेक्षा भारतीय संघ व्यवस्थापन अश्विनला प्राधान्य देऊ शकते.

Swara Bhaskar Baby Girl: अभिनेत्री स्वरा भास्करने दिला गोंडस मुलीला जन्म, पाहा फोटो

अश्विनची वनडे कारकीर्द अशी राहिली
अश्विनने आतापर्यंत भारतासाठी 115 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 115 सामन्यांमध्ये अश्विनने 4.95 च्या इकॉनॉमी आणि 33.2 च्या सरासरीने 155 खेळाडूंना बाद केले आहे. अश्विनची वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 25 धावांत 4 बळी. याशिवाय गरज पडल्यास अश्विन आपल्या फलंदाजीने योगदान देऊ शकतो. अश्विनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 86.96 च्या स्ट्राइक रेटने आणि 16.44 च्या सरासरीने 707 धावा केल्या आहेत.

Tags

follow us