IND vs SA : विश्वचषक स्पर्धेत आज (World Cup 2023) भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सामना होत आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. दोघांनाही वेगवान सुरुवात केली आहे. विश्वचषकात भारताचा संघ (Team India) अतिशय मजबूत स्थितीत आहे. आतापर्यंत भारताने एकही सामना गमावलेला नाही. तर दुसरीकडे सुरुवातीला पराभवाचे धक्के बसल्यानंतर आफ्रिकेने जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे आजचा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना खेळला जात आहे.
या दोन्ही फलंदाजांनी भारताला वेगवान सुरूवात करून दिली आहे. आतापर्यंत संघाच्या 6 ओव्हर्समध्ये 62 धावा झाल्या आहेत. आज विराट कोहलीचा वाढदिवस (Happy Birthday Virat Kohli) आहे. आज विराटला सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर 49 शतके आहेत. सध्या विराटची 48 शतके झाली आहेत. फक्त एकच शतक बाकी आहे. आजच्या सामन्यात जर विराटला शतक करता आले तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करता येईल.
Happy Birthday Virat Kohli : विराटचे 35 रेकॉर्ड्स! लवकरच सचिनचं ‘खास’ रेकॉर्डही तुटणार
रोहित शर्मा- शुभमम गिल बाद
भारताला वेगवान सुरुवात करून दिल्यानंतर भारताला पहिला धक्का बसला आहे. रोहित शर्मा 40 धावांवर असताना कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बावुमाच्या हाती कॅच देऊन बाद झाला. यानंतर आता विराट कोहली मैदानात आला आहे. दुसऱ्या बाजूला शुभमन गिल आहे. या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली आहे. मात्र रोहित शर्मा बाद झाल्याने संघाला झटका बसला आहे. यानंतर शुभमन गिलही फार काही करू शकला नाही. 23 धावांवर असताना केशव महाराजच्या गोलंदाजीवर गिल बाद झाला. यानंतर आता श्रेयस अय्यर मैदानात आला आहे.
असा आहे भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, शमी, सिराज, जसप्रित बुमराह.
असा आहे आफ्रिकेचा संघ
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी.