India vs England : वर्ल्डकपच्या (World Cup 2023) आजच्या सामन्याच भारताने इंग्लंडवर मोठा विजय मिळविला आहे. या विजयाबरोबर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताने सलग सहावा विजय मिळविण्याचा पराक्रम केला आहे. याचबरोबर गुणतालिकेत भारत बारा गुणांसह पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याचबरोबर भारताचा सेमीफायनलचा मार्ग मोकळा झाला आहे. आर भारताने इंग्लंडसमोर 230 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. गतविजेत्या इंग्लंडचा संघ 129 धावांवर गारद झाला आहे. तर याच बरोबर इंग्लंडचा संघ वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीच्या रेसमधून बाहेर झाला आहे.
Maratha Reservation : ‘आम्ही चर्चेला तयार’; शंभूराज देसाईंनी सांगून टाकलं
रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या खेळीच्या जोरावर भारताने 229 धावा केल्या होत्या. त्यानंतर मोहम्मद शमीने घातक गोलंदाज करत इंग्लंडचे चार गडी टिपले. तर जसप्रीत बुमराहने तीन बळी घेतले. कुलदीप यादवने दोन आणि रवींद्र जडेजाने एक बळी घेतला. इंग्लंड सहा सामने खेळला असून, त्यात पाच सामन्यांत पराभव झाला आहे.
Maratha Reservation : उद्या शिंदे समितीची बैठक; टिकणारच आरक्षण देण्याची भूमिका, देसाईंनी सांगितलं
230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेयरस्टो आणि डेव्हिड मलान यांनी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. बुमराहने सलग दोन चेंडूत मलान आणि जो रुटसला तंबूत परतविले. तर शमीने बेन स्टोक्सला खातेही उघडू दिले नाही. तर बेयरस्टोला चौदा धावांवर बोल्ड केले. कर्णधार जोस बटलरही दहा धावांवर बाद झाला. त्याला कुलदीप यादवने बाद केले. 52 धावांवर इंग्लंडचा अर्धसंघ बाद झाला होता. त्यामुळे इंग्लंडला कमबॅक करू शकला नाही.
शमीने मोईन अलीला पंधरा धावांवर बाद केले. तर क्रिस वोक्सला रवींद्र जडेजाने बाद केले. लियाम लिविंगस्टोनला कुलदीपने बाद केले. इंग्लंडचे आठ फलंदाज 98 धावांवर बाद झाले. उर्वरित दोन फलंदाजनेही झुंजार खेळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही लगेच तंबूत परतविले आहे.
रोहित, सूर्यकुमारची झुंजार खेळी
कर्णधार रोहित शर्माच्या 87 आणि सूर्यकुमार यादवच्या 49 धावांच्या जोरावर भारताने नऊ बाद 229 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने तीन, तर क्रिस वोक्सने व आदिल रशीदने प्रत्येकी दोन बळी घेतले आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाज मोठी कामगिरी करू शकले नाही. रोहित शर्मा व के.एल. राहुलने (39 धावा) चौथ्या गड्यासाठी 91 धावांची भागीदारी केली. भारताचे तीन फलंदाज 40 धावांत बाद झाले होते. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल नऊ, विराट कोहली शून्य आणि श्रेयस अय्यर चार धावांवर बाद झाले. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता.