Download App

World Cup 2023: भारत-पाकिस्तान महामुकाबला; मुंबई-अहमदाबाद विशेष ट्रेन धावणार

World Cup 2023: गुजरातमधील अहमदाबाद येथे भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यासाठी पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना विशेष सुविधा देण्यासाठी पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, अहमदाबादमध्ये 14 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यासाठी विशेष ट्रेनमुळे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या क्रिकेट चाहत्यांच्या अतिरिक्त गर्दीला सामावून घेता येईल. पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार ही विशेष गाडी मुंबई सेंट्रल येथून धावून दुसऱ्या दिवशी परतेल. यासाठी रेल्वेने विशेष भाडे निश्चित केले आहे.

सामन्याच्या दिवशी पोहणार
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद दरम्यान विशेष तिकाटांवर सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक 09013/09014 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल दरम्यान धावेल. ट्रेन क्रमांक 09013 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद स्पेशल शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई सेंट्रल येथून 21.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05.30 वाजता अहमदाबादला पोहोचेल.

अक्षय कुमारचा ‘मिशन राणीगंज’ बॉक्स ऑफिसवर आपटला, जाणून घ्या कलेक्शन

त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 09014 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल स्पेशल अहमदाबादहून रविवार, 15 ऑक्टोबर 2023 रोजी 04.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी दादर, बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि वडोदरा जंक्शन येथे दोन्ही दिशेने थांबते.

वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसरा विजय, अफगाण संघाला 8 विकेटने हरवले

14 ऑक्टोबरला होणार महामुकाबला
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. या सामन्याच्या सुरक्षेसाठी अहमदाबादमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे, तर अहमदाबाद मेट्रो देखील सामन्याच्या दिवशी पहाटे 1 वाजता सेवा प्रदान करेल. पाकिस्तानचा संघ 11 वर्षांनंतर अहमदाबादमध्ये सामना खेळणार आहे. या सामन्याला एक लाखाहून अधिक प्रेक्षक येण्याची शक्यता आहे.

Tags

follow us