भारतात खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषकाला अगदी थोडेच दिवस शिल्लक राहिले असून, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाना भारताकडून व्हिसा देण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत भारतीय संघाचा कडवा प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला व्हिसा देण्यात आलेला नाही. त्यामुळे पाकच्या संघाचा कर्णधार बाबर आझमने विश्वचषकासाठी केलेले खास प्लानिंग फिस्कटण्याची शक्यता आहे. व्हिसा न मिळाल्याने पाकिस्तानी खेळाडूंसह पीसीबीची धाकधूक वाढली आहे.
भारतात खेळवल्या जाणाऱ्या विश्चचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून, त्याआधी 29 सप्टेंबरपासून सराव सामने खेळवले जाणार आहे, यंदाच्या विश्वचषकात 10 संघ संहभागी होणार असून, पाकिस्तानच्या संघाला सोडून अन्य सर्व संघांना भारतात येण्यासाठी व्हिसा देण्यात आलेला आहे.
भारतात सहभागी होण्यापूर्वी दुबईत करणार सराव
पाकिस्तानच्या संघाने भारतात विश्वचषकात सहभागी होण्यापूर्वी दुबईमध्ये सराव करणारचे प्लानिंग केले आहे. येथील सरावानंतर पाकिस्तानचा संघ हैदराबाद येथे दाखल होणार होता. मात्र, अद्याप पाकच्या संघाला व्हिसा न मिळाल्याने संघातील खेळाडूंसह कर्णधार आझमने विश्वचषकासाठी केलेल्या खास प्लानिंगवर पाणी फिरण्याची चिन्ह आहेत.
पाकिस्तान संघाने भारतात येण्यासाठी आठवडाभरापूर्वी व्हिसासाठी अर्ज केलेला आहे. मात्र, अद्यपपर्यंत त्याला मंजुरी मिळालेली नसून, भारताकडून निर्धारित वेळेत व्हिसा मिळेल अशी आशा पाकिस्तानी संघाच्या व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघ न्यूझीलंड संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.
पाकिस्तानच्या संघात नेमकं कोण?
आगामी विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघाने 22 सप्टेंबर रोजी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. यात खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असणाऱ्या नसीम शाहला वगळ्यात आले आहे. नसीम ऐवजी संघात हसन अलीचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय संघात शादाब खान, मोहम्मद नवाज आणि उसामा मीर या तीन फिरकी गोलंदाजांनाही संधी देण्यात आली आहे.
विश्चचषकासाठी असा आहे पाकचा संघ
बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, मोहम्मद वसीम जूनियर, सौद शकील, हरिस रौफ.