फलंदाजीसह आता शुभमन गिलची ज्योतिष शास्त्रातही ‘मास्टरी’; विराटवरील भाकितामुळे चर्चा

Shubman Gill Prediction About Virat Kohli & Team India : भारतीय संघाच्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर संघाने यंदाच्या विश्वचषकातील हंगामात सर्वच्या सर्व आठ सामन्यांमध्ये विजयी पताखा फडकवली आहे. संघातील अनेक खेळाडूंच्या कामगिरीमुळे ते चर्चेत आहेत. यात काही फलंदाज आहेत तर, काही गोलंदाज. मात्र, यातील एक फलंदाज म्हणजे शुभमन गिल ज्याची नेहमीच चर्चा होते. परंतु, यावेळी तो […]

फलंदाजीसह चाहत्यांना आता शुभमन गिल भविष्यही सांगणार; विराटवरील भाकितामुळे चर्चा

Letsupp Image 2023 11 06T111647.405

Shubman Gill Prediction About Virat Kohli & Team India : भारतीय संघाच्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर संघाने यंदाच्या विश्वचषकातील हंगामात सर्वच्या सर्व आठ सामन्यांमध्ये विजयी पताखा फडकवली आहे. संघातील अनेक खेळाडूंच्या कामगिरीमुळे ते चर्चेत आहेत. यात काही फलंदाज आहेत तर, काही गोलंदाज. मात्र, यातील एक फलंदाज म्हणजे शुभमन गिल ज्याची नेहमीच चर्चा होते. परंतु, यावेळी तो एका भविष्यवाणीमुळे चांगलाच चर्चेत आला असून, आता शुभमन गिलकडे फलंदाजीसह ज्योतिषशास्त्राचेपण गुण आहेत का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहे.

World Cup 2023 : भारताचा सलग आठवा ‘विराट’ विजय, दक्षिण आफ्रिकेचा 83 धावांत खुर्दा !

विराटबाबतचं भाकित ठरलं खर…

काल (दि.5) कोलकाता येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने धमाकेदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी मोठा पराभव केला. गिलने कोहलीबाबत वर्तवलेलं भाकित केवळ कालच्या सामन्या पुरतं नव्हतं तर, ते आतापर्यंतच्या सर्वच सामन्यांबाबत होतं.

काय बोलला होता शुभमन गिल?

शुभमन गिलने भारत-दक्षिण आफ्रिका सामना सुरू होण्यापूर्वी एका चॅनेलशी संवाद साधला होता. त्यावेळी त्याने सांगितले होते की, विरोटच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन विजयाने दुप्पट व्हावे अशी इच्छा आहे. याशिवाय त्याने कोहलीही शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी करेल असे भाकित केले होते.

हिटमॅन रोहित शर्मा ठरला सिक्सर किंग; एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी

अन् झालेही तसेच…

नाणेफेक झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघ गिलने केलेल्या भाकितानुसार पहिल्या चेंडूपासून विजयाच्या आत्मविश्वासाने खेळताना दिसून आली. त्याचप्रमाणे कोहलीने सचिनच्या विक्रमी शतकांची बरोबरी करावी हे भाकितही सत्यात उतरले. कोहलीच्या शतकी खेळीबरोबरच भारताने मोठ्या फरकाने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे कोहलीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन दुप्पट होणार हे भाकितही तंतोतंत खरे ठरले.

संवाद साधनाता गिलने कोहलीचे शतक होईल किंवा भारतीय संघ वियजी होईल असा कोणताही दावा केला नव्हता. मात्र, या दोन्ही गोष्टी व्हाव्यात अशी आशा व्यक्त केली होती. त्याच्या या दोन्ही आशा सत्यात उतरल्यानंतर इतरवेळी सारा तेंडुलकरमुळे चर्चेत असणारा गिल यावेळी त्याने वर्तवलेल्या भाकितामुळे चर्चेत आला आहे.

AFG vs Pak Match Inside Story : अफगाणिस्तानने पाकिस्तानला नमविले | LetsUpp Marathi

Exit mobile version