हिटमॅन रोहित शर्मा ठरला सिक्सर किंग; एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी

हिटमॅन रोहित शर्मा ठरला सिक्सर किंग; एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी

कोलकाता : विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने (Rohit Sharma) आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. सुरुवातीपासूनच त्याने त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडला आहे. प्रत्येक डावात त्याने चौकार आणि षटकार ठोकले आहेत. त्याच्या याच खेळामुळे हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा आता सिक्सर किंग बनला आहे. शिवाय आता तो वनडे मध्ये एका वर्षात सर्वाधिक सिक्स मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 2 षटकार मारून वनडे फॉरमॅटमध्ये एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Rohit Sharma equals AB de Villiers’ record in ODI format by hitting 2 sixes against South Africa)

रोहितने केली डिव्हिलियर्सची बरोबरी :

रोहित शर्माने या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यांमध्ये आतापर्यंत एकूण 58 षटकार मारले आहेत. वनडे फॉरमॅटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याच्या एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यांमध्ये 58 षटकार ठोकले होते. आतापर्यंत एबी डिव्हिलियर्स या विक्रमात आघाडीवर होता, मात्र आता रोहित शर्माने त्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

Happy Birthday Virat Kohli : विराटचे 35 रेकॉर्ड्स! लवकरच सचिनचं ‘खास’ रेकॉर्डही तुटणार

परंतु रोहित शर्मासाठी हे वर्ष आणि हा विश्वचषक अजूनही संपलेला नाही. भारत सेमी फायनलसाठी क्वालिफाय झाल्याने किमान 3 सामने खेळायचे आहेत, त्यामुळे रोहित डिव्हिलियर्सचा विक्रम मागे टाकून एका वर्षात एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर करताना दिसू शकतो.

World Cup 2023 : भारत, आफ्रिका, ऑस्ट्रेलियाची एन्ट्री पक्की; सेमीफायनलचा चौथा संघ कोणता?

या यादीत तिसरे नाव वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू आणि युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलचे आहे. गेलने 2019 मध्ये वेस्ट इंडिजसाठी वनडे फॉरमॅटच्या एका वर्षात एकूण 56 षटकार मारले होते. या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावाचाही समावेश आहे, जो त्याच्या काळात लांब षटकारांसाठी ओळखला जात होता. त्याने 2002 मध्ये पाकिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 48 षटकार मारले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube