Download App

IND vs AFG : IPL मधील वादानंतर कोहली-नवीन पुन्हा येणार आमने-समाने

  • Written By: Last Updated:

WC 2023 IND Vs AFG Match : आयसीसी वर्ल्डकपचा फिव्हर आता हळू हळू वाढण्यास सुरूवात झाली असून, ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्या पराभूत करून भारताने विश्वचषकाची विजयी सुरूवात केली आहे. त्यानंतर आज (दि. 11) भारताचा मुकाबला अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) होम ग्राऊंडवर होणार असल्याने मैदान खचाखच भरलेले असणार आहे. याशिवाय सर्वांच्या नजरा या कोहली आणि अफागिस्तानचा खेळाडू नवीन उल हक (Naveen Ul Huq) यांच्यावर असणार आहे. (Virat Kohli Vs Naveen Ul Huq)

World cup 2023: विश्वचषकात पाकिस्तानने रचला इतिहास; मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत लंकेला नमवले

कोहली-नवीन पुन्हा येणार आमने-सामने

नुकत्याच झालेल्या IPL 2023 च्या सामन्यांदरम्यान नवीन उल आणि कोहलीमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. तेव्हापासून या दोन्ही खेळाडूंमध्ये तणाव आहे. क्रिकेटच्या मैदानापासून ते सोशल मीडियापर्यंत या दोघांमध्ये बराच संघर्ष झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यादरम्यानही या दोघांमध्ये काटे की टक्कर पाहण्यास मिळू शकते.

वाद सोडवण्यासाठी गंभीरची मध्यस्थी

नवीन उल हक हा आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघाकडून खेळतो. यंदाच्या सीझनमध्ये कोहली आणि लखनऊच्या संघात सामना सुरू असताना नवीन आणि कोहली यांच्यात जोरदार वाद झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की, तो सोडवण्यासाठी सपोर्टिंग स्टाफ सदस्य गौतम गंभीरलाही मैदानात यावे लागले होते. यानंतर नवीन उल हकने सोशल मीडियावर विराट कोहलीचे नाव न घेता निशाणा साधला होता. याला कोहलनीदेखील चोख प्रत्युत्तर दिले होते.

‘मातृपक्षावरच दावा सांगणे ही शिंदे-पवार गटाची लफंगेगिरी’; ठाकरे गटाची जळजळीत टीका

केएल राहुलकडे असणार चाहत्यांच्या नजरा

ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या सामन्यात आघाडीचे फलंदाज काही विशेष कामगिरी न करता तंबूत परतले होते. त्यामुळे भारतीय संघावर पराभवाचे ढग होते. मात्र, कोहली आणि केएल राहुल यांनी मैदानावर संयमी खेळी करत पराभव खेचून आणला होता. त्यानंतर आजच्या सामन्या राहुल आणि कोहलीची जोडी काय कमाल करते याकडे सर्वांच्या नजरा असणार आहे.

फिरोज शाह कोटला मैदानावर कशी आहे भारताची कामगिरी

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आजचा सामना दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानावर खेळवला जाणार आहे. या मैदानावरील टीम इंडियाच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, भारताने आतापर्यंत या मैदानावर 21 सामने खेळले आहेत, त्यापैकी 13 जिंकले आहेत. तर, शेवटचा सामना 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आहे. या सामन्यात कुलदीप यादवने 4 विकेट घेत टीम इंडियाला सहज विजय मिळवून दिला होता. अशा परिस्थितीत टीम इंडियाला अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंचे आव्हान पेलावे लागणार असून, अफगाण संघालाही टीम इंडियाच्या कुलदीप आणि रवींद्र जडेजा या गोलदाजांच्या भेदक बॉलिंगचा सामना करावा लागणार आहे.

Tags

follow us