Download App

World Cup 2023 : जुन्या आठवणी पुन्हा ताज्या; यंदाही सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड भिडणार!

World Cup 2023 : विश्वचषकामध्ये आता पुन्हा जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत. कारण श्रीलंकेविरुद्धचा सामन्यात न्यूझीलंडने आरामात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत चौथ्या नंबरवर असलेल्या भारतीय संघाचा न्यूझीलंडसोबत सेमी फायनल सामना होणार आहे. 2019 साली झालेल्या विश्वचषकामध्येदेखील भारत न्यूझीलंडमध्ये सेमीफायनल सामना रंगला होता. त्या सामन्यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला होता.

Air Quality : हवेची गुणवत्ता खालावली! CM शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; प्रदुषण रोखण्याच्या दिल्या सूचना

विश्वचषकातील 41 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंकेमध्ये पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला आहे. या विजयामुळे पाकिस्तान संघासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. न्यूझीलंडच्या विजयासह पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा आता संपुष्टात आल्या आहेत. या विजयामुळे आता न्यूझीलंडचे 10 गुण झाले आहेत.

Cash For Query : महुआ मोईत्रा यांची खासदारकी धोक्यात? आजच्या बैठकीतच होणार फैसला

यंदाच्या विश्वचषकात प्रथम पात्र ठरवण्याचा मान भारतीय संघाने मिळवला आहे. भारतीय संघानंतर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका संघ आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया संघ आहे. भारतासह दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाही पात्र ठरले आहेत. यानंतर चौथ्या उपांत्य फेरीचा प्रबळ दावेदार न्यूझीलंड 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

‘लाज उरली नाही, किती खालची पातळी गाठाल…’; पीएम मोदींचा नितीश कुमारांवर हल्लाबोल

पाकिस्तान 8 गुणांसह पाचव्या आणि अफगाणिस्तान 8 गुणांसह सहाव्या स्थानावर असून बाहेर पडलेल्या संघांची सुरुवात होते, बाहेर पडलेल्या संघात इंग्लंड 4 गुणांसह सातव्या स्थानावर आहे, बांगलादेश 7 गुणांसह आठव्या स्थानावर आहे, श्रीलंका 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे आणि नेदरलँड 4 गुणांसह 10 स्थानावर आहे.

दरम्यान, न्यूझीलंडशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संघही चौथ्या क्रमांकाच्या शर्यतीत आहेत, मात्र, खराब नेट रनरेटमुळे या दोघांनाही शेवटचे सामने जिंकूनही पात्र ठरणे फार कठीण आहे. पाकिस्तानचा निव्वळ धावगती +0.036 आणि अफगाणिस्तानचा निगेटिव्ह -0.338 आहे.

Tags

follow us