Download App

World Cup 2023 मध्ये भारताचा विजयी ‘षटकार’तर इंग्लंडने केला ‘तो’ लाजिरवाणा विक्रम

World Cup 2023 : वर्ल्डकपच्या (World Cup 2023) रविवारच्या सामन्यात भारताने इंग्लंडवर मोठा विजय मिळविला आहे. या विजयाबरोबर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताने सलग सहावा विजय मिळविण्याचा पराक्रम केला आहे. याचबरोबर गुणतालिकेत भारत बारा गुणांसह पहिल्या क्रमांकावर आला आहे. तर दुसरीकडे इंग्लंडने मात्र एक लाजिरवाणा विक्रम केला आहे.

इंग्लंडने केला ‘तो’ लाजिरवाणा विक्रम…

वर्ल्डकपच्या (World Cup 2023) रविवारच्या सामन्यात भारताने इंग्लंडवर मोठा विजय मिळविला त्यामुळे टीम इंडिया विश्व चषकाच्या इतिहासातील सर्वांत जास्त सामने जिंकणारा क्रमांक दोनचा संघ ठरला आहे. तर न्यूझीलंडला मागे टाकत भारताने 59 सामने जिंकले. तर इंग्लड विश्व चषकाच्या इतिहासातील सलग चार सामने हारणारा संघ ठरला आहे. हा लज्जास्पद विक्रम इंग्लंडच्या नावे झाला आहे.

Maratha Reservation : आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत आहे का? – विखे पाटील

दरम्यान टीम इंडिया विश्व चषकाच्या इतिहासातील सर्वांत जास्त सामने जिंकणारा क्रमांक दोनचा संघ ठरला आहे. तर ऑस्ट्रेलिया हा संघ या यादीत पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वांत जास्त 73 सामने जिंकलेले आहेत. तर भारताने 59 सामने जिंकत मागे टाकल्याने न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

Andhra Tarin Accident मध्ये मृतांचा आकडा वाढला; 13 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

तर रविवारच्या सामन्यानंतर गुणतालिकेत भारत बारा गुणांसह पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याचबरोबर भारताचा सेमीफायनलचा मार्ग मोकळा झाला आहे. आर भारताने इंग्लंडसमोर 230 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. गतविजेत्या इंग्लंडचा संघ 129 धावांवर गारद झाला आहे. तर याच बरोबर इंग्लंडचा संघ वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीच्या रेसमधून बाहेर झाला आहे.

Tags

follow us