ICC Cricket World Cup 2023 : आजपासून (दि.5) आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023)स्पर्धेला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड(New Zealand) यांच्यात आज पहिली लढत होत आहे. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होण्याआधीच बीसीसीआयचे (BCCI)सचिव जय शाहा (Jai Shah)यांनी एक मोठी घोषणा केली आहे. विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत पाणी दिले जाणार असल्याची घोषणा केली.
भारतामध्ये होणारा विश्वचषक सर्वांच्या आठवणीत राहण्यासाठी बीसीसीआयकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. विश्वचषकाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी बीसीसीआयने क्रिकेटप्रेमींसाठी मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाहा यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, विश्वचषक 2023 दरम्यान स्टेडियममधील प्रेक्षकांना सर्व ठिकाणी मोफत पाणी दिले जाईल.
भाजपकडे बहुमत असताना ते माझ्यासारख्याचं का ऐकत होते? पवारांचा फडणवीसांना खोचक सवाल
येणारा काळ हा रोमांचकारी आहे. 2023 च्या विश्वचषतकाच्या पहिल्या चेंडूची आम्ही आतुरतेने वाट पाहात आहोत. विश्वचषकादरम्यान सर्व स्टेडियममधील प्रेक्षकांना आम्ही मोफत मिनरल आणि पॅकिंग केलेले पाणी उपलब्ध करुन देणार आहोत. हे जाहीर करताना मला अभिमान वाटतो. हायड्रेटेड रहा आणि सामन्यांचा आनंद घ्या, विश्वचषकादरम्यान अविस्मरणीय आठवणी तयार करुया, असेही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सामने कुठे होणार?
विश्वचषक 2023 स्पर्धेतील सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमसह 10 क्रिकेट ग्राऊंडवर हे सामने होणार आहेत. यामध्ये हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियम, धरमशालाचे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएश स्टेडियम, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम, चेन्नईचे एमए चिदंबरम स्टेडियम, लखनऊचे भारतरत्न श्री अटलबिहारी वापेयी एकना क्रिकेट स्टेडियम, पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, बंगळुरुचे एम. चिन्नास्वामी स्टेडियम, मुंबईचे वानखेडे स्टेडियम आणि कोलकाताचे ईडन गार्डन या स्टेडियमचा समावेश असणार आहे.
भारतामध्ये आयोजित होणारा विश्वचषक हा एकूण 46 दिवस सुरु राहणार आहे. विश्वचषकामध्ये एकूण 10 टीम सहभागी सहभागी झाल्या आहेत. या टीममध्ये विविध
शहरांमध्ये सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये 48 सामने खेळले जाणार आहेत.