World Cup 2023 : विश्वचषक 2023च्या फायनलमध्ये (World Cup 2023) भारतीय संघ शानदार कामगिरी करत दाखल झाला आहे. आता दुसऱ्या उपांत्य फेरीत 5 वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. सलग सात सामने जिंकून ऑस्ट्रेलिया उपांत्यफेरीत दाखल झाली. वर्ल्डकपची खराब सुरूवात झालेल्या दक्षिण आफ्रिकेनेही ७ विजय मिळवले आहेत. त्यामुळे कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठीची लढत चुरशीची होण्याची अपेक्षा आहे. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर आफ्रिकेच्या अव्वल फलंदाजांनी नांग्या टाकल्या आहेत. आफ्रिकेची चार बाद 24 धावा अशी अवस्था झाली. टेम्बा बावुमा, क्विंटन डी कॉक, अँडन मार्करम आणि रासी वान डेर डुसेन झटपट बाद झालेत.त्यानंतर डेविड मिलर आणि क्लासेन यांनी डाव सांभाळला आहे. अशातच दुसऱ्या उपांत्य सामन्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. काही वेळ पावसाने सामन्यात व्यत्यय आणला होता. त्यानंतर सामना सुरू झाला आहे.
रामाच्या दर्शनाचं अमिष का दाखवता? अयोध्यावारीच्या घोषणेवरुन राज ठाकरे कडाडले…
हवामान विभागाने काय सांगितलं?
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला म्हणजेच आजच होणार आहे. मात्र, हवामान खात्यानुसार, कोलकात्यात पावसाची शक्यता आहे. सध्या तेथे केवळ 25 टक्के पावसाचा अंदाज असून त्याचवेळी आकाश ढगाळ राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय हवामान खूप दमट असणार आहे.
Dhangar Reservation : अल्टिमेटम संपला, आता माघार नाही! चौंडीत आजपासून उपोषणाचा ‘आवाज’
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झाला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला चारीमुंड्या चीत करीत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यानंतर आता भारतासोबत नेमका कोणता संघ अंतिम सामन्यात असणार आहे, याचीच क्रिकेटप्रेमींना उत्सुकला लागून राहिली आहे.
निवडणुकीनंतर दारावर ED धडकणार! भाजपच्या मुख्यमंत्र्यांची काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांला जाहीर धमकी
अशातच आज विश्वचषक स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. जर आजचा दुसरा उपांत्य सामना पावसाअभावी होऊ शकला नाहीतर दुसऱ्या दिवशी सामना आयोजित केला जाणार असल्याचं आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसं नाही झालं तर या सामन्यात 20-20 षटकांचा सामना होऊन निकाल लावण्यात येणार आहे.
राखीव दिवशी पावसामुळे 20-20 षटकांचा सामनाही खेळता आला नाही तर काय होईल? या परिस्थितीत, ICC त्यानंतर साखळी फेरीतील गुणतालिकेतील संघाच्या क्रमवारीच्या आधारे अंतिम फेरीतील कोण वर आहे या आधारे निर्णय घेईल. आणि त्यानुसार गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीचे तिकीट मिळू शकते.