निवडणुकीनंतर दारावर ED धडकणार! भाजपच्या मुख्यमंत्र्यांची काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांला जाहीर धमकी

निवडणुकीनंतर दारावर ED धडकणार! भाजपच्या मुख्यमंत्र्यांची काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांला जाहीर धमकी

Chhattisgarh Election 2023 : भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma)यांनी बुधवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल (Bhupesh Baghel)यांच्यावर महादेव अॅप प्रकरणात (Mahadev App Case)508 कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरुन जोरदार निशाणा साधला. हिमंत बिस्वा सरमा यांनी महादेव अॅपवरुन गंभीर आरोप करत एक प्रकारे इशारा दिला आहे. ईडीकडून (ED)त्यांना निवडणूक लढण्यासाठी वेळ दिला आहे. ही त्या यंत्रणेची उदारता आहे, पण निवडणुकीनंतर मात्र ईडी आपल्या दारावर येईल, अशी थेट धमकीच भाजप नेते हिमंत बिस्वा सरमा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना दिली आहे.

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना भोपाळमधून अटक; बेपत्ता असल्याने लोकेशन ट्रेस करुन कारवाई

हिमंता बिस्वा यांनी कॉंग्रेसच्या छत्तीसगड सरकारमधील त्यांच्या सहकार्‍यांसह बघेल यांच्या कथित पक्षांतर्गत शत्रुत्वाची खिल्ली उडवली आहे. या सर्व घटनांवर टीएस सिंगदेव सर्वाधिक आनंदी असल्याचा आरोपही यावेळी केला.

थिएटर्स रिकामे पण पिक्चर हाऊसफुल्ल! काय आहे बॉक्स ऑफिसचा कॉर्पेरेट बुकिंग फंडा?

सरमा म्हणाले की, भूपेश बघेल यांना माहीत आहे की, आपण तुरुंगात जाणार आहोत. पण त्यांना एकट्याला तुरुंगात जायचे नाही, त्यांच्यासोबत आणखी 10 जणांना न्यायचे आहे. ईडी सध्या त्यांच्याकडे गेली नाही, मात्र निवडणुकानंतर मात्र ती त्यांच्या दारी जाईल, असा इशाराही यावेळी हिमंता बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना दिला आहे.

ईडीने भूपेश बघेल यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. निवडणुकीनंतर मात्र ईडी त्यांच्या दारावर जाणार आहे. सरमा म्हणाले की, ईडीने छत्तीसगडच्या विधानसभा
निवडणुकीपूर्वी बघेल यांना तपासात सहभागी होण्यास न सांगून खूप मोठेपणा दाखवल्याचेही ते म्हणाले.

ईडीने न्यायालयासमोर सांगितले की, भूपेश बघेल यांनी 508 कोटी रुपये स्विकारले. तरी देखील अद्याप ईडीने त्यांना नोटीस बजावली नाही. बघेल यांनी ईडीचे आभार मानायला पाहिजे कारण त्यांच्याकडून अशी सुविधा कोणालाही दिली जात नाही. ईडी आणि बघेल यांचे चांगले संबंध असावेत. नाहीतर त्यांना आत्तापर्यंत नोटीस का मिळाली नाही? असाही सवाल भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी उपस्थित केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube