थिएटर्स रिकामे पण पिक्चर हाऊसफुल्ल! काय आहे बॉक्स ऑफिसचा कॉर्पेरेट बुकिंग फंडा?

  • Written By: Published:
थिएटर्स रिकामे पण पिक्चर हाऊसफुल्ल! काय आहे बॉक्स ऑफिसचा कॉर्पेरेट बुकिंग फंडा?

Corporate Booking : बॉलिवडूचा किंग खान शाहरूखचा (shahrukh khan) जवान (Javan Film) हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, तेव्हा शाहरुख सोशल मीडियावर चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल सतत अपडेट देत होता. त्यावेळी एका चाहत्याने शाहरुखला ट्विटरवर विचारले की, अॅडव्हान्स बुकिंगमधील किती तिकिटे ऑर्गेनिक आहेत आणि कॉर्पोरेट बुकिंगची किती आहेत, हे एकदा स्पष्ट करावं. त्यावेळी शाहरुखन उत्तर दिलं. मात्र, तरीही बॉलिवूड चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या सत्यतेवरचे सवाल काही संपले नाहीत. दरम्यान, आता सवाल निर्माण झालाय की, इंडस्ट्रीतील निर्मात्यांनी आणि मेकर्संनी ट्रेंडमध्ये आणलेला कॉर्पोरेट बुकिंगचा (Corporate Booking) फंडा नेमका आहे तरी काय?

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना भोपाळमधून अटक; बेपत्ता असल्याने लोकेशन ट्रेस करुन कारवाई 

आजकाल सर्वच चित्रपट निर्माते हे अॅडव्हान्स बुकींगला प्राधान्य देत असतात. एका रिपोर्टनुसार, सलमानखानच्या टायगर 3 चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये दमदार कामगिरी केली होती. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची जवळपास 2.88 लाख तिकिटे विकली गेली होती. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगद्वारे 8.01 कोटी रुपयांची कमाई केली होती. आगाऊ बुकिंग सुरू झाल्यानंतर तीन दिवसांत ब्रह्मास्त्रची 66 हजार आणि ‘गदर 2’ची 62 हजार तिकिटांची विक्री झाली होती.

Neha Malik : भोजपुरी क्वीन नेहा मलिकच्या किलर लुक्सनं घातला धुमाकूळ

कॉर्पोरेट बुकिंग म्हणजे काय?
कॉर्पोरेट बुकिंग म्हणजे काय, हे सामान्य भाषेत समजाऊन सांगायचं असेल तर एखाद्या खाजगी कंपनीने तिच्या वैयक्तिक कारणांसाठी केलेले बुकिंग असा होतो. तथापि, जर आपण उद्योगाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर येथे गोष्टी अनेक स्तरांवर आहेत. कॉर्पोरेट व्यतिरिक्त, येथे ब्लॉक बुकिंग शब्द वापरला जातो.

ब्लॉक बुकिंग आणि कॉर्पोरेट बुकिंग यात फरक काय?
प्रसिद्ध चित्रपट उद्योग विश्लेषक गिरीश जोहर यांनी याबाबत बोलतांना सांगितले की, जर एखादा चित्रपट प्रदर्शित होत असेल आणि त्याच चित्रपटाच्या स्टुडिओ हाऊस किंवा निर्मात्याने मोठ्या प्रमाणात बुकिंग केले असेल तर त्याला कॉर्पोरेट बुकिंग म्हटलं जातं. कॉर्पोरेट बुकिंग देखील ब्रँडद्वारे केले जाते. यामध्ये एकाहून अधिक शहरात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात तिकीट आरक्षित केले जातात. तर ब्लॉक बुकिंग म्हणजे ज्यामध्ये फॅमिली ग्रुप किंवा फॅन क्लबचे सदस्य छोट्या स्तरावर तिकीट खरेदी करतात. ते केवळ एका सिनेमागृह आणि शहरापुरते मर्यादित असते.

कॉर्पोरेट बुकिंग जुनी संकल्पना
गिरीश जोरह यांनी पुढं सांगितलं की, हे पूर्वीही व्हायचे. अनेक चित्रपट निर्माते तिकीट खरेदी करून थिएटर हाऊसफुल्ल घोषित करायचे. त्यावेळी थिएटरमध्ये हजार प्रेक्षक बसू शकत असतं. पण केवळ नऊशे तिकिटे विकली गेली, तर चित्रपट निर्माता थिएटर मालकांना म्हणायचा, माझ्या नावाने १०० तिकिटे खरेदी करा, कारण, चित्रपट हाऊसफुल व्हावा हा त्यामागचा हेतू. पण त्यावेळी निर्मात्यांनी तेवढं प्रेशर्स घेत नसतं. मात्र, आता चित्रपट हाऊसफुल व्हावा, यासाठी निर्माते धडपडतात. संपूर्ण थिएटर रिकामे असलं तरी निर्माते स्वतहून तिकीट खरेदी करून चित्रपट हाऊसफुल्ल घोषित करतात. मात्र, यामुळे निर्मात्यांचे नुकसान होत आहे. ते स्वतःचा पैसा गुंतवत आहेत. चित्रपटगृह हाऊसफुल्ल असल्यास निर्मात्यांनाही जीएसटी भरावा लागतो. पण खरी गंमत यापुढं आहे.

हा ट्रेंड चित्रपटांसाठी खरोखर फायदेशीर आहे का?
स्टार्सच्या कलेक्शनची अतिशयोक्ती करणे हा त्यामागचा उद्देश आहे. जेणेकरून त्या अभिनेत्याची ब्रँड व्हॅल्यू आणखी वाढेल, जेणेकरून त्याच्या नावावर आणखी चित्रपट विकले जातील. दुसरा उद्देश असा आहे की अशा प्रकारचे बनावट डेटा तयार करून प्रेक्षकांमध्ये एक आश्चर्य आणि उत्सुकता तयार केली जाते. जेणेकरून प्रेक्षकांची चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी होईल. गेल्या काही वर्षांतील जे काही कलेक्शन रिपोर्ट्स आले आहेत, मी दाव्याने सांगतो की, आमची तिकिटे 100 टक्के विकली गेली आहेत असे निर्मात्यांनी सांगितले तरी त्यात अजिबात तथ्य असणार नाही. तथापि, याचा ट्रेंडचा फायदा हा जुगारासारखा आहे. कधी ही युक्ती कामी येते, तर कधी या ट्रेंडमुळे निर्मात्याला प्रचंड नुकसान सहन करावे लागते.

आगाऊ बुकिंगसाठी दबाव
दक्षिण चित्रपट उद्योग विश्लेषक रमेश बाला या कॉर्पोरेट बुकिंगचा आणखी एक पैलू सांगतात, आजच्या काळात स्पर्धा इतकी वाढली आहे की निर्मात्यांना विविध मार्केटिंगचे डावपेच वापरावे लागतात. विशेषत: नुकत्याच सुरू झालेल्या आगाऊ बुकिंगच्या दबावाने निर्माते आणि निर्मात्यांना मजबूर केलंय. चित्रपटाची चांगली छाप पडावी म्हणून ते अॅडव्हान्स तिकिटांच्या माध्यमातून कॉर्पोरेट बुकिंग करतात, जेणेकरून अॅडव्हान्स बुकिंग हाऊसफुल्ल किंवा 80 टक्के दाखवले जाते. साधी गोष्ट आहे, चित्रपटांची एडव्हान्स बुकींग सुरू आहे, तर प्रेक्षकांना तिकीट मिळणार नाही, याची भीती असते. मग तेही आधीच चित्रपटाची बुकींग करतात.

रमेश म्हणतात, अनेकवेळा जेव्हा एखादा दर्शक बुकिंगसाठी साइट उघडतो आणि पाहतो की सर्व जागा रिक्त आहेत, तेव्हा नक्कीच त्याच्या मनात विचार येतो की कदाचित चित्रपट चांगला नाही, म्हणूनच लोक तो पाहत नाहीत. आणि जर अ‍ॅपमध्ये तिकीटं विकली गेल्याचं दाखवलं जातं, तर तुमच्या आत कुठेतरी एक कुतूहल निर्माण होतं की तिकीटं इतक्या वेगाने विकली जात असतील, तर चित्रपट नक्कीच मनोरंजक असेल. अनेक वेळा निर्मात्यांची ही युक्ती कामी येते आणि तिकिटांच्या और्गनिक बुकिंगला वेग येतो.

बॉलीवूड नेहमीच लक्ष्य का?
सुप्रसिद्ध व्यापार विश्लेषक तरण आदर्श कॉर्पोरेट बुकिंगशी अजिबात सहमत नाहीत. तरण यांच्या म्हणण्यानुसार, अशा शब्दांचा वापर करून इंडस्ट्रीविरोधात खोटी गोष्ट रुजवल जाते. तरण म्हणतात, असं काही नाही. जर एखाद्या ब्रँडने एखाद्या अभिनेत्याला मान्यता दिली तर ते त्याचे तिकीट खरेदी करतात. यात नुकसान काय आहे? तो अभिनेता स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करत नाही. दुसरे म्हणजे बॉलिवूडला नेहमीच टार्गेट केले जाते. दक्षिणेत लोक पन्नास पन्नास तिकीटं खेरीद करतात, पण, तोच प्रकार बॉलीवूडमध्ये झाला तर आक्षेप घेतले जातात.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube