Download App

World cup 2023 : भारत-पाक सामन्यापूर्वी शुभमन गिल ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’

World cup 2023 : ICC ने सप्टेंबर 2023 साठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ जाहीर केला आहे. यावेळी शुभमन गिलची महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. शुभमनने सहकारी खेळाडू मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा सलामीवीर डेव्हिड मलान यांना मागे टाकून हे विजेतेपद मिळवले आहे.

सप्टेंबर महिन्यात शुभमनने 80 च्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीने 480 धावा केल्या होत्या. सप्टेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. आशिया कपमध्ये त्याने 75.5 च्या सरासरीने 302 धावा केल्या होत्या. यानंतर गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यांमध्ये 178 धावा केल्या होत्या.

शुभमनची आठ डावांत अशी होती कामगिरी
शभूमननेही सप्टेंबरमध्ये दोन शतके झळकावली होती. त्याने आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध शतक आणि दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरे शतक झळकावले. गिलने या काळात तीन अर्धशतकेही झळकावली. सप्टेंबरमध्ये खेळलेल्या 8 डावांमध्ये तो केवळ दोनदा 50 पेक्षा कमी धावांवर बाद झाला होता.

एकदिवसीय सामन्यात शुभमनची सरासरी
आत्तापर्यंत शुभमन गिलचा वनडे रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. 24 वर्षीय शुभमनने 35 एकदिवसीय सामन्यांमध्ये 66.1 च्या फलंदाजीच्या सरासरीने 1917 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट देखील 102.84 आहे. सध्या तो आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या तो डेंग्यूमधून पूर्णपणे बरा न झाल्यामुळे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी पहिले दोन सामने खेळू शकला नाही. 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्यात तो पुन्हा एकदा भारतीय सलामीची जबाबदारी स्वीकारेल अशी अपेक्षा आहे.

Tags

follow us