Download App

World Cup 2023 : टीम इंडियाला झटका! शुभमन गिल पहिलाच सामना मुकणार?

World Cup 2023 : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला (World Cup 2023) कालपासून सुरुवात झाली आहे. यंदा ही स्पर्धा भारतात होत आहे. टीम इंडिया (Team India) सध्या लयीत दिसत असून विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे. मात्र, या स्पर्धेच्या सुरुवातीलाच संघाचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. भारताचा तुफान फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळाली आहे. शुभमन गिल हा सध्या डेंग्यूने आजारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आज काही चाचण्यांनंतर संघ व्यवस्थापन गिलच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेईल असे सांगण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो आजारी पडला होता. त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली.

World Cup 2023 : पहिल्याच सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा न्यूझीलंडकडून धुव्वा !

भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत होणार आहे. या हाय होल्टेज सामन्याची टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. पहिला सामना जिंकून स्पर्धेतील वाटचाल सुरू करण्याचा संघाचा इरादा आहे. मात्र, सुरुवातीलाच डोकेदुखी वाढवणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. शुभमन गिलला ताप आला आहे. त्यामुळे तो कदाचित पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच आहे.

गुरुवारी चेन्नईत झालेल्या संघाच्या नेट सेशनमध्येही तो सहभागी झाला नव्हता. त्यानंतर त्याच्या डेंग्यू संबंधित चाचण्या करण्यात आल्या. आता त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. बीसीसीआयचे पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. गिल पहिला सामना खेळेल की नाही याचा अद्याप खुलासा झालेला नाही. आज शुक्रवारी चाचणीची दुसरी फेरी होणार आहे. त्यानंतर गिल पहिल्या सामन्यात उपलब्ध होऊ शकेल नाही याचा निर्णय घेता येईल. त्यामुळे आता ही चाचणी येऊन निकाल येईपर्यंत चाहत्यांची धाकधूक मात्र वाढली आहे.

World Cup 2023 : बीसीसीआयची मोठी घोषणा! वर्ल्डकप सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मिळणार ‘ही’ सुविधा

स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलँँड विजयी

विश्वचषकाच्या (World Cup 2023) पहिल्याच सामन्यात गजविजेत्या इंग्लंडला (England) उपविजेत्या न्यूझीलंडने (New Zealand) नऊ विकेटने पराभूत केले. डेवोन कॉन्वे (Devon Conway) आणि रचिन रविंद्र (Rachin Ravindra) या दोघांच्या तुफानी शतकाच्या जोरावर न्यूझीलँडने हा विजय मिळविला आहे. इंग्लँडने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलँडसमोर 283 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य न्यूझीलँडने केवळ एक विकेटच्या बदल्यात 36. 2 षटकात पूर्ण केले आहे. त्यामुळे न्यूझीलँडची विश्वचषकाची सुरुवातच धमाकेदार झाली आहे.

 

Tags

follow us