World Cup Final : विश्वचषकाचा अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टक्कर होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता रविवारी दोन्ही संघात फायनल सामना होणार आहे. जो जिंकेल वर्ल्डकप त्याचाच. तेव्हा दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. क्रिकेटप्रेमीही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही जण सामना पाहण्यासाठी अहमदाबादेत दाखल होत आहेत. त्यामुळे येथील हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. येथील हॉटेल्सचे दर मात्र प्रचंड वाढले आहेत. सामन्याची तिकीटं मिळणंही सोपं राहिलेलं नाही. मोठ्या मुश्किलीनं तिकीटं मिळतात. त्यात पुन्हा या कृत्रिम महागाईचाही फटका चाहत्यांना बसत आहे. एरव्ही 500 ते 700 रुपये प्रति दिवस भाडं असणाऱ्या हॉटेल्सचे दर तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर लक्झरी हॉटेल्समध्ये एक दिवसाच्या मुक्कामाचे तब्बल 1 लाख रुपये घेतले जात आहेत.
सामना पाहण्यासाठी लोक हजारोंच्या संख्येने अहमदाबादेत दाखल होत आहेत. गर्दी वाढल्याने प्रवासाचे दरही वाढले आहेत. दिल्ली ते अहमदाबाद विमान तिकीटाची किंमत 15 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच मुंबई अहमदाबाद प्रवासाचेही दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे तुम्हालाही जर सामना पाहण्यासाठी अहमदाबाद जायचं असेल तर पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची तयारी ठेवा.
भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार
वर्ल्डकपच्या (World Cup 2023) दुसऱ्या रोमहर्षक सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. येत्या रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत (India) व ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्डकप जिंकण्यासाठी भिडणार आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवातीला दाणादाण उडाली. परंतु डेव्हिड मिलरच्या झुंजार शतकीय खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सात गड्यांच्या मोबदल्यात 48 व्या षटकात गाठले.
world cup 2023 : रोहितने केली चाहत्यांची इच्छा पूर्ण; विराटने घेतली नऊ वर्षानंतर नववी विकेट
टॉप ऑर्डरने केला घात
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. टॉप ऑर्डरमधील चारही फलंदाज संघाच्या 24 धावांवर तंबूत परतले होते. परंतु त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर डेव्हिड मिलरने झुंजार खेळी केली. त्याने शानदार शतकही झळकविले. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या आहेत. जोश हेजलवुड आणि ट्रेविड हेड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.