World Cup पात्रता फेरीत UAE च्या गोलंदाजाचा मजेशीर Video, पाहून हसू आवरेना

World Cup या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. यासाठी सध्या आयसीसी विश्वचषकाचे पात्रता सामने खेळले जात आहेत. या स्पर्धेदरम्यान यूएई आणि जर्सी यांच्यात सामना झाला. या सामन्यात एक मजेदार क्षणही पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. The Qualifier Play-off did have some bad blood, but there was this, and […]

WhatsApp Image 2023 04 07 At 3.32.34 PM

WhatsApp Image 2023 04 07 At 3.32.34 PM

World Cup या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. यासाठी सध्या आयसीसी विश्वचषकाचे पात्रता सामने खेळले जात आहेत. या स्पर्धेदरम्यान यूएई आणि जर्सी यांच्यात सामना झाला. या सामन्यात एक मजेदार क्षणही पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रथम फलंदाजी करताना UAE ने 50 षटकात 7 गडी गमावून 284 धावा केल्या. आसिफ खानने 82 आणि मोहम्मद वसीमने 65 धावा केल्या. प्रत्युत्तरात जर्सीचा संघ 218 धावांत गारद झाला. कार्तिक मयप्पनने चार आणि जुनैद सिद्दीकीने तीन विकेट घेतल्या. या तारकीय परफॉर्मन्सशिवाय आणखी एका गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. जोश लॉरेन्सनला बाद करताना रोहन मुस्तफाने झेल पकडताना एक मजेशीर गोष्टी केली आहे.

जर्सीच्या डावाच्या 21व्या षटकात मुस्तफाने जोशला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. झेल घेताना मुस्तफाचा हातात चेंडू अनेक वेळा उसळला, पण शेवटी मुस्तफाने हा झेल पूर्ण केला. झेल घेतल्यानंतर तो खूप आनंदी दिसत होता आणि त्याने नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला हॅरिसन कार्लीयनला मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Nitin Gadakari : नितीन गडकरी अतिरेकी संघटनांच्या रडारवर? पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर 

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर जर्सी संघ 285 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 66 धावांनी पराभूत झाला. कार्लिऑनने 85 धावांची शानदार खेळी खेळली, पण ती संघाला विजयासाठी पुरेशी ठरली नाही. आसा ट्राइबने 48 चेंडूत 40 धावा केल्या. यूएईच्या कार्तिक मयप्पन आणि जुनैदशिवाय जहूर खानने दोन आणि मुस्तफाने एक विकेट घेतली.

Exit mobile version