world cup matches 2023 : काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील (Maharashtra)अनेक मोठ-मोठे उद्योग धंदे गुजरातमध्ये (Gujrat)पळवले जात असल्याचे आरोप केले जात आहेत. महाराष्ट्रात होऊ घातलेले वेदांता, फॉक्सकॉन, सेमीकंडक्टर प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नेण्यात आले आहेत. मोठ-मोठ्या प्रकल्पांनंतर आता महाराष्ट्राच्या मुंबईमधील वानखेडे क्रिकेट स्टेडिअममधील (Wankhede Cricket Stadium)सामनेही गुजरातमध्ये होणार असल्याने क्रिकेटप्रेमींमधून संतापाची लाट उसळताना दिसून येत आहे. एकदिवसीय विश्वचषकाचे सामने याआधी महाराष्ट्रातील वानखेडे स्टेडिअमवर अनेक सामने झाल्याचं पाहायला मिळत होतं. आता मात्र, वानखेडेसारख्या स्टेडिअमला डावलून एकदिवसीय विश्वचषकाचा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये (Narendra Modi Stadium)ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातल्या स्टेडिअमला कमी लेखून गुजरातचं महत्व वाढवल्याचं दिसून आलं आहे. क्रिकेटचे सामनेही मुंबईमधील वानखेडे स्टेडिमचं महत्वही कमी केल्याची भावना क्रिकेटप्रेमींमधून व्यक्त होत आहे. (world-cup-matches-2023-maharashtra-mumbai-wankhede-stadium-gujrat-narendra-modi-stadium)
भाजप की काँग्रेस… बीआरएस कोणाची टीम? केसीआर यांनी अखेर पक्षाचं नावचं सांगितलं!
एकदिवसीय विश्वचषकाची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईत सकाळी 11.30 वा. बीसीसीआयने एक पत्रकार परिषद घेऊन विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रक पाहिल्यानंतर महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची भावना क्रीडाप्रेमींमध्ये उफाळून आली आहे. तसेच मुंबईमधील वानखेडे स्टेडियमचं महत्व कमी केलं जात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. ऑक्टोबरमध्ये विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होत आहे.
Nitesh Rane : केसीआर भाजपची नाही, तर संजय राऊतच राष्ट्रवादीची ‘ढ टीम’; नितेश राणेंचा राऊतांवर निशाणा
भारतातील एकूण 10 मैदानांवर हे सामने खेळवले जाणार आहेत. त्यात महाराष्ट्रामधील फक्त दोन मैदानांवर हे सामने खेळवले जाणार आहेत. त्यात मुंबईमधील वानखेडे स्टेडियम आणि पुण्यातील गुहंजे येथील स्टेडिअमवर सामने रंगणार आहेत. या दोन स्टेडिअमवर दहा सामने होणार आहेत. मुंबईमधल्या वानखेडे स्टेडिअमवर उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. तर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकाचा पहिला आणि शेवटचा सामना होणार आहे.
आयपीएल 2023 चा अंतिम सामनाही गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात आला. त्याचवेळी मुंबईमधील वानखेडे स्टेडिअमचे महत्व कमी होत असल्याची भावना व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा वानखेडे स्टेडिअमचं महत्व कमी केलं जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. कारण विश्वचषकाचा अंतिम सामनाही गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. तर वानखेडे स्टेडिअमवर उपांत्य सामना खेळवला जाणार आहे.
Prithvi Shaw Controversy : मुंबई पोलिसांकडून पृथ्वी शॉला क्लिनचीट; सपनाचे सर्व आरोप खोटे
महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यातील मैदानावर दहा सामने होणार आहेत. यातीव नऊ सामने हे साखळी फेरीमधील आहेत. अन् एक सामना उपांत्य फेरीचा आहे. तो वानखेडे स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. महाराष्ट्रातील या दोन स्टेडिअमवर भारताचे दोन साखळी सामने रंगणार आहेत.
पुण्यातील स्टेडिअमवर 19 ऑक्टोबरला बांगलादेशविरोधात आणि वानखेडेवर क्वालिफायर 2 सोबत टीम इंडियाचा सामना होणार आहे. टीम इंडिया जर सेमीफायनलमध्ये पोहोचली तर मुंबईमध्ये सामना होण्याची शक्यता आहे.
केंद्राकडून मुंबईचं महत्व कमी केलं जात असल्याची टीका महाराष्ट्रातील विरोधी पक्षांकडून केली जात आहे. त्यातच आता विश्वचषकाच्या सुरुवातीचा सामना आणि अंतिम सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होत असल्याने आता महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींमधून मुंबईमधील वानखेडे स्टेडिअमचं महत्व कमी केलं जात असल्याची भावना क्रिकेटप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.