ICC World Cup 2023 : विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; 15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान भिडणार
ICC World Cup 2023 Schedule : यंदाच्या वर्षी भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक ICC ने जाहीर केले असून, या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 2019 मध्ये या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला होता ज्यात इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार असून, 15 ऑक्टोबरला भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे.
ICC World Cup 2023: India to face Pakistan on October 15 at Narendra Modi Stadium in Ahmedabad. pic.twitter.com/7Gb66BOElE
— ANI (@ANI) June 27, 2023
या विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी आठ संघ आधीच पात्र ठरले आहेत आणि उर्वरित दोन ठिकाणी झिम्बाब्वेमध्ये पात्रता फेरी खेळली जात आहे, ज्यामध्ये सहा संघ सुपर सिक्समध्ये पोहोचले आहेत. यातील दोन संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या मुख्य फेरीत सहभागी होणार आहेत.
सध्या पहिले दोन विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिज संघ या विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. श्रीलंका आणि झिम्बाब्वेला मुख्य फेरीत खेळण्याची सर्वाधिक संधी आहे. उर्वरित दोन संघ विश्वचषक स्पर्धेत कधी सहभागी होणार याचाही निर्णय 9 जुलै रोजी होणार आहे.
या स्पर्धेत आयसीसी विश्वचषक राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवला जाईल. म्हणजे या स्पर्धेत एकही गट नसेल. सर्व 10 संघ एकूण 9-9 लीग सामने खेळतील. अव्वल 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि त्यानंतर विश्वचषकाची अंतिम फेरी दोन सर्वोत्तम संघांमध्ये खेळवली जाईल.
GET YOUR CALENDARS READY! 🗓️🏆
The ICC Men's @cricketworldcup 2023 schedule is out now ⬇️#CWC23https://t.co/j62Erj3d2c
— ICC (@ICC) June 27, 2023
वर्ल्ड कप 2023 शेड्यूल
8 ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
15 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ
2 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई
5 नोव्हेंबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
11 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, बेंगळुरू