Download App

WPL 2024 : महिला क्रिकेटसाठी गुडन्यूज! रॉजर बिन्नी-जय शाह यांंच्या नेतृत्वात कमिटी

WPL 2024 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला प्रिमियर लीग (WPL 2024) क्रिकेटला चालना देण्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मंडळाने आता अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या नेतृत्वात आठ सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे. या समितीत बीसीसीआयचे सचिव जय (Jay Shah) शाह यांना संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याव्यतरिक्त अरुण धुमाळ, राजीव शुक्ला, आशिष शेलार, देवजित सैकिया, मधुमती लेले आणि प्रभज्योत भाटिया हे या समितीचे सदस्य असतील. WPL 2024  स्पर्धा सुरू होण्याआधी उद्या (शनिवार) मुंबईत लिलाव आयोजित करण्यात आले आहेत. पुरुष क्रिकेट खेळाडूंच्या आयपीएल प्रमाणेच महिला खेळाडूंच्या WPL 2024 या स्पर्धांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी बीसीसीआयकडून प्रयत्न केले जात आहेत.

मोठी बातमी : टीम इंडियाचा हेड कोच पुन्हा ‘द वॉल’ BCCI कडून राहुल द्रविडला एक्सटेन्शन

महिला प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी भागधारक, खेळाडू आणि क्रिकेट चाहते यांचा विचार करून समिती काम करणार आहे. या समितीला महिला क्रिकेटला नवी ओळख निर्माण करून देण्याचे काम करायचे आहे. कारण, महिला क्रिकेट अजूनही फारसे प्रसिद्ध नाही. सामन्यांवेळीही स्टेडियम रिकामेच असते. अशा परिस्थितीत समितीसमोर अनेक आव्हाने आहेत.

महिला क्रिकेट प्रीमियर लीगसाठी उद्या मुंबईत लिलाव आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी 165 खेळाडूंनी नावे दिली आहेत. यानंतर स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा आणि ठिकाणे जाहीर होण्याची शक्यता आहे. या लिलावात 165 पैकी 30 खेळाडूंची निवड करण्यात येईल. पाच फ्रँचायझी फक्त 30 खेळाडू खरेदी करू शकतील. या लिलावात फ्रँचायझी 17.65 कोटी रुपये खर्च करू शकतील. महिला क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा केव्हा सुरू होतील याबाबत अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही.

IPL Auction : 1166 खेळाडू अन् 263 कोटींचा वर्षाव; जाणून घ्या, IPL लिलावाची ‘खास बात’

Tags

follow us

वेब स्टोरीज