IPL Auction : 1166 खेळाडू अन् 263 कोटींचा वर्षाव; जाणून घ्या, IPL लिलावाची ‘खास बात’

IPL Auction : 1166 खेळाडू अन् 263 कोटींचा वर्षाव; जाणून घ्या, IPL लिलावाची ‘खास बात’

IPL Auction : पुढील वर्षात होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धांसाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी (IPL Auction) दुबईत होणार आहे. या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊसच पडणार आहे. आयपीएलकडून (IPL 2024) अद्याप अधिकृत माहिती दिली गेली नसली तरी या लिलावात एकूण 1166 खेळाडू सहभागी होतील अशी चर्चा आहे. मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, डेरिल मिशेल, रचिन रवींद्र ही अशी काही नावं आहेत जे सध्या त्यांच्यासाठी फ्रँचायझीच्या शोधात आहेत. जोश हेझलवुड खेळण्याची खात्री नसली तरी त्याचं नाव लिलावासाठी दिलं गेलं आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, 1166 खेळाडूंनी लिलावासाठी आपले नाव दिले आहे. यामध्ये 830 भारतीय खेळाडू आहेत तर 336 विदेशी खेळाडू आहेत. यामध्ये 212 कॅप्ड, 909 अनकॅप्ड आणि 45 असोसिएट खेळाडूंचाही सहभाग आहे. या लिलावात फ्रँचायझी टीम तब्बल 262.95 कोटी रुपये खर्च करू शकतात.

830 भारतीय खेळाडूंपैकी 18 कॅप्ड खेळाडू आहेत. यामध्ये वरुण अॅरॉन, केएस भरत, केदार जाधव, सिद्धार्थ कौल, धवल कुलकर्णी, शिवम मावी, शाहबाज नदीम, करुण नायर, मनीष पांडे, हर्षल पटेल, चेतन सकारिया, मनदीप सिंह, बरिंदन सरन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकट, हनुमा विहारी, संदीप वारियर आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. या खेळाडूंपैकी हर्षल पटेल, केदार जाधव, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव या चार खेळाडूंना त्यांच्या फ्रँचायझींनी रिलीज केले होते. या खेळाडूंनी त्यांची बेस प्राइस 2 कोटी रुपये निश्चित केली होती. अन्य 14 खेळाडूंनी त्यांची बेस प्राइस 50 लाख रुपये निश्चित केली आहे.

IPL 2024 : मुंबईत ‘हार्दिक’ स्वागत! अखरेच्या दोन तासांत गुजरातने ‘सेनापती’ सोडला

इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (27) याने लिलावात नाव का दिलं नाही याची माहिती अद्याप समजलेली नाही. परंतु, दुखापतीमुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतल्याची चर्चा सुरू आहे. यावेळी लिलावात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज, आयर्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, युएई, नामीबिया, नेपाळ, नेदरलँड्स, स्कॉटलंड आणि अमेरिकेचे खेळाडू आहेत.

विश्वचषकात चमकदार खेळ करणाऱ्या न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने त्याची बेस प्राइस 50 लाख रुपये निश्चित केली आहे. परंतु, त्याच्यासाठी मोठी बोली लागेल अशी शक्यता आहे. भारताविरुद्ध टी 20 मध्ये पहिले शतक करणारा जोस इंग्लिस, स्टिव्ह स्मिथ, जोश हेझलवुडही स्पर्धेत आहेत. वानिंदु हसरंगा सुद्धा दीड कोटींच्या ब्रॅकेटमध्ये आहे. हसरंगाला आरसीबीने रिलीज केले आहे.

IPL 2024 बद्दल मोठी बातमी.. परदेशात होणार स्पर्धा, जाणून घ्या कारण

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube