IPL 2023 मध्ये 35 सिक्स मारणारा खेळाडू भारतीय संघात

IPL 2023 मध्ये 35 सिक्स मारणारा खेळाडू भारतीय संघात

Shivam Dube Asian Games 2023 Team India : BCCI ने आशियाई खेळ 2023 साठी संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघात अनेक नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचे स्वरूप टी-२० असेल. यासाठी आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यातील कामगिरी लक्षात घेऊन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात शिवम दुबेच्या नावाचाही समावेश आहे. शिवमने गेल्या आयपीएल मोसमात दमदार कामगिरी केली होती. तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता.

IPL 2023 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत शिवम दुबे दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने 35 षटकार मारले होते. शिवमने 16 सामन्यांच्या 14 डावात 418 धावा केल्या. यादरम्यान ३ अर्धशतके झळकावली. त्याने भारतासाठी 13 टी-20 सामनेही खेळले असून. यामध्ये 105 धावा केल्या. त्याने भारतासाठी एक वनडे सामनाही खेळला आहे. त्याने सर्वमिळून 106 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 1913 धावा केल्या आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ज्या खेळाडूवर रोहितने अविश्वास दाखवला तोच ठरला हिरो

टीम इंडियात सामील झाल्याबद्दल चेन्नई सुपर किंग्सने शिवमचे खास अभिनंदन केले आहे. टीमने शिवमचा फोटो ट्विट केला आहे. CSK ने कॅप्शन लिहिले की, “Sixer Dube reloading in Blue”. 4600 हून अधिक लोकांनी हे ट्विट लाईक केले आहे. तर अनेक चाहत्यांनी कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या.

Aamir Khan चं चीन-पाकिस्तानवर जास्त प्रेम; ‘त्या’ व्हिडीओमुळे नेटकरी भडकले

शिवमने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडियासाठी पदार्पण टी-20 सामना खेळला होता. यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला. 2020 नंतर तो भारतीय संघात पुनरागमन करू शकला नाही. पण आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी त्याची संघात निवड झाली आहे. शिवमने डिसेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हा त्याचा आतापर्यंतचा पहिला आणि शेवटचा एकदिवसीय सामना होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube