Download App

Wrestlers Protest : आंदोलनस्थळांवरच वीज आणि पाणी कापलं; हा क्रूरपणाचा कळस म्हणत आव्हाड संतापले

  • Written By: Last Updated:

“लैंगिक शोषणाविरुद्ध जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीर मुलींची वीज आणि पाणी कापलं. भ्याडपणा आणि क्रूरपणाचा हा कळस आहे.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड  यांनी केली आहे.  दिल्लीतील (Delhi)जंतर मंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंचे हे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे.

केंद्र सरकारकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न चालू आहे, अशी टीका होता असतानाच आज आंदोलन स्थळावरील वीज आणि पाणी कापलं असल्याची बातमी आली आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड संतापले आहेत. आव्हाड यांनी सासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

ब्रृजभूषण सिंह यांच्या विरोधातील आंदोलनाचा खर्च भागवतांना कुस्तीपटूंची दमछाक; 5 दिवसांत झाला इतका….

आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात की, लैंगिक शोषणाविरुद्ध जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीर मुलींची वीज आणि पाणी कापलं. भ्याडपणा आणि क्रूरपणाचा हा कळस आहे. ते पुढे म्हणतात की, “त्या ऑलिंपिक पदकं मिळवून आल्या तेव्हा याच पंतप्रधानांनी त्यांना जेवायला बोलावलं होतं.”

प्रियंका गांधीही कुस्तीपटूंना भेटण्यासाठी जंतरमंतरवर

दरम्यान आज काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीही कुस्तीपटूंना भेटण्यासाठी पोहोचल्या. प्रियांका गांधी यांनी विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, ” सरकार सांगत आहे की दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ज्याची प्रत अद्याप मिळालेली नाही, जेणेकरून त्यात कोणत्या कलमांचा समावेश आहे हे कळू शकेल. एफआयआर नोंदवला असेल तर दाखवावा. या व्यक्तीवर अनेक गंभीर आरोप आहेत. तो व्यक्ती त्या पदावर असताना चौकशी करणे शक्य नाही, त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा.”

Defamation Case : राहुल गांधींना दिलासा मिळणार? याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी

राजीनामा देणे ही काही मोठी गोष्ट नाही, पण…

आज भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी कुस्तीपटूंनी लावलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, केलेले सर्व आरोप निराधार असून जनतेमुळे मला पद मिळाले. हे खेळाडूंचे आंदोलन नाही, मी फक्त निमित्त आहे, टार्गेट दुसरं कोणीतरी आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीही मोठं नाही.

यावेळी राजीनाम्याच्या मागणीसवर ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, या कुस्तीपटूंची जुनी विधाने ऐकली तर कळेल की जानेवारी महिन्यात त्यांनी मी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. राजीनामा देणे ही काही मोठी गोष्ट नाही, पण मी तो देणार नाही.

Tags

follow us