WTC 2023 Final : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला आज सुरुवात झाली आहे. भारत व ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये हा मुकाबला होणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना अतिशय रंजक होणार असे बोलले जात आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा पोहोचणार भारत हा एकमेव संघ आहे. या सामन्यात भारताचा विजय होण्याची तीन प्रमख कारणं सांगितली जात आहे. ज्यामुळे भारत ऑस्ट्रेलियाला मात देऊ शकतो. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने ही कारणं सांगितली आहे.
‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत
पहिलं कारण
अलीकडेच भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलय. ते सुद्धा भारतात नाही तर थेट ऑस्ट्रेलियामध्ये भारताने कांगारुंना धुळ चारली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या गाबाच्या मैदानावर विजय संपादन केला. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. सध्या शुभमन गिल व विराट कोहली हे दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्मात आहे. टीम इंडियाने 350 ते 400 धावा केल्या तर त्यांच्याकडे चांगली संधी आहे.
‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत
दुसरं कारण
हरभजन पुढे म्हणाला की, ओव्हलच्या पीचवर स्पिनर्सना बाऊन्स मिळतो. टीम इंडियाचे स्पिनर्स ओव्हलवर चालतील. उष्णतेमुळे तिथे स्पिनर्सला टर्न सुद्धा मिळेल. अस हरभजनने म्हटले आहे.
तिसरं कारण
भारताचे सीमर्स फॉर्ममध्ये आहेत. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी कमालीची गोलंदाजी करत आहेत. दोघांनी आयपीएलमध्ये उत्तम प्रदर्शन केलं असून दोन्ही खेळाडू फॉर्मात आहे. तसेच उमेश यादव सुद्धा या खेळपट्टीचा चांगला फायदा उचलू शकतो.