Download App

WTC जिंकणारा संघ होणार मालामाल, ICC ने उघडला खजिना, या संघांना मिळणार मोठी रक्कम

  • Written By: Last Updated:

WTC : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या विजेत्याला 13.2 कोटी रुपये बक्षीस मिळणार मिळणार आहे. तर उपविजेत्याला 6.5 कोटी चे बक्षिसे मिळणार आहे. आयसीसीने शुक्रवारी याची घोषणा केली. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान ओव्हल येथे खेळवला जाईल. स्पर्धेची बक्षीस रक्कम 2019-21 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सारखीच आहे.

त्यावेळी, केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने $1.6 दशलक्ष (सुमारे 16.21 कोटी रुपये) आणि एक चमकणारी गदा जिंकली होती. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या एकूण31 कोटी 39 लाख 42 हजार 700 रुपये बक्षीस रक्कम सर्व नऊ संघांना विभागून दिली जाईल. दक्षिण आफ्रिकेला. तिसऱ्या क्रमांकासाठी 3 कोटी 72 लाख रुपये मिळतील. चौथ्या स्थानासाठी इंग्लंडला 2 कोटी 88 लाख रुपये मिळतील. श्रीलंकेला पाचव्या स्थानासाठी 1 कोटी 65 लाख दिले जातील. उर्वरित संघांना प्रत्येकी 82 लाख 56 हजार रुपये मिळतील.

चेन्नईचे फायनलसाठी ‘घातक’ अस्त्र तयार, प्रत्येक मोठ्या सामन्यात दाखवतोय ताकद

चॅम्पियनशिपचा निर्णायक सामना ओव्हल, लंडन येथे 7 ते 11 जून दरम्यान खेळला जाईल, 12 जून हा राखीव दिवस असेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची बक्षीस रक्कम चॅम्पियनशिपच्या उद्घाटन हंगामाप्रमाणेच आहे. उल्लेखनीय म्हणजे, न्यूझीलंडमधील मालिका पराभवापूर्वी अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी वादात सापडलेला श्रीलंका पाचव्या स्थानावर घसरला.

त्याची बक्षीस रक्कम 2 कोटी 88 लाख रुपये आहे. सहाव्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड, सातव्या क्रमांकावर असलेला पाकिस्तान, आठव्या क्रमांकावर असलेला वेस्ट इंडिज आणि नवव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशला प्रत्येकी 82 लाख 56 हजार रुपये मिळतील.

Tags

follow us