WTC Final 2023, India vs Australia :
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल मॅचमध्ये थर्ड अंपायरच्या निर्णयावरून वाद सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने चौथ्या दिवसाच्या खेळात 270 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला आणि भारताला 444 धावांचे लक्ष्य दिले. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhamn Gill) यांनी नवीन जोमाने धावा काढण्यास सुरुवात केली. (wtc-final-2023-shubman-gill-wicket-create-controversy-fans-reaction-on-social-media-india-vs-australia)
दरम्यान, गिलच्या विकेटवरुन सध्या मोठा वाद सुरु झाला आहे. यावरुन थर्ड अंपायरने फसवणूक केल्याचा आरोप ट्विटर युजर्स करत आहेत. भारतीय संघाची धावसंख्या 41 असताना स्कॉट बोलँडचा एक चेंडू गिलच्या बॅटच्या बाहेरच्या काठावर आदळला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कॅमेरून ग्रीनने हा झेल टिपला. पण यावेळी मैदानावरील पंचांना या झेलवर संशय आला आणि त्यांनी तिसऱ्या पंचाकडे जाण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात तिसऱ्या पंचाची भूमिका बजावणाऱ्या रिचर्ड केटलबर्गने रिप्ले पाहिल्यावर त्यानी गिलला आऊट दिले. मात्र आता चाहत्यांसह अनेक माजी खेळाडूंनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. वास्तविक, रिप्ले पाहिल्यावर चेंडू जमिनीवर घासत असल्याचे दिसत होते. यानंतर तिसर्या पंचांच्या या निर्णयावर कर्णधार रोहित शर्माही चांगलाच संतापला होता आणि त्याने त्या वेळी मैदानावरील पंचांशीही चर्चा केली होती.
गिल दुसऱ्या डावात अवघ्या 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
या सामन्यात शुभमन गिलने दुसऱ्या डावाची सुरुवात शानदार केली. खराब चेंडूंवर धावा काढण्याची एकही संधी तो सोडत नव्हता. पण गिल 19 चेंडूत 18 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी, पहिल्या डावात गिलच्या बॅटने 13 धावांची खेळी पाहायला मिळाली.