WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलचे पहिले 2 दिवस संपूर्णपणे ऑस्ट्रेलियन संघाच्या नावावर राहिले. पहिल्या दिवशी कांगारू फलंदाजांनी आपले कौशल्य दाखवले, तर दुसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपले कौशल्य दाखवले. दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही (Sourav ganguly)रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) न खेळवण्याच्या निर्णयावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (wtc-final-2023-sourav-ganguly-lauds-nathan-lyon-and-raised-question-rohit-sharma-and-rahul-dravid-decision-not-include-ashwin)
या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 469 धावांवर आटोपला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 151 धावांपर्यंत आपले 5 विकेट गमावल्या होत्या. कांगारू संघाचा ऑफस्पिनर नॅथन लायननेही आपल्या फिरकीची जादू दाखवत महत्त्वाच्या वेळी रवींद्र जडेजाची विकेट मिळवून संघाची पकड मजबूत करण्याचे काम केले.
या सामन्यात समालोचकाच्या भूमिकेत असलेला सौरव गांगुली लियॉनची विकेट घेतल्यानंतर म्हणाला, कोण म्हणतं ऑफ-स्पिन गोलंदाज हिरव्या खेळपट्टीवर खेळू शकत नाही? डाव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध लियॉनचा हा चेंडू पहा. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 400 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी त्याला भारताच्या सर्वोत्तम फलंदाजाची विकेट मिळाली आहे.
Champions Trophy 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद जाणार
दुसरीकडे, लियॉनची स्तुती करताना गांगुली पुढे म्हणाला की लक्षात ठेवा की तो केवळ आशियामध्येच नाही तर ऑस्ट्रेलियातही विकेट घेतो, जिथे वेगवान गोलंदाजीसाठी योग्य खेळपट्ट्या आहेत. माझ्या मते, तो आतापर्यंतच्या महान गोलंदाजांपैकी एक आहे.
अश्विनचा समावेश न करून भारतीय संघाने मोठी चूक केली
गांगुलीने यापूर्वीही रविचंद्रन अश्विनला संघात न घेण्याच्या निर्णयावर टीका केली होती. या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी गांगुली म्हणाला होता की, अश्विनचा समावेश न करून भारतीय संघाने मोठी चूक केली आहे. अश्विन संघात असताना जडेजाला दुसऱ्या टोकाकडून मिळणारी मदत मिळणार नाही.