WTC Final IND vs AUS Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम (WTC) सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (IND Vs AUS Test Day1) लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु झाली आहे. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे तर ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे. नाणेफेक जिंकून भारतीय टीमने गोलंदाजीचा निर्णय घेत आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ जगातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक आहेत आणि विजेतेपदाची लढत अतिशय रोमांचक असेल अशी अपेक्षा आहे.
‘आमच्या नियुक्त्या कायदेशीरच’; जेजुरी वादावर नवनियुक्त विश्वस्त पहिल्यांदाच थेट बोलले
ऑस्ट्रेलियाने लीग स्टेजमध्ये अव्वल स्थान मिळवून WTC फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. यासोबतच भारतीय संघाने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहून अंतिम फेरी गाठली.टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा WTC फायनलमध्ये (WTC Final 2023) प्रवेश केला. WTC च्या सुरुवातीच्या काळात अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून भारताला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यावेळी टीम इंडियाला अशी चूक पुन्हा करायला परवडणार नाही.
यासह भारतीय संघालाही आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवायचा आहे. भारताने 2013 मध्ये आयसीसीचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आता भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघातील 11 खेळाडू :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात रविचंद्रन अश्विनला संधी मिळालेली नाही. भारतीय संघात रवींद्र जडेजा हा एकमेव फिरकी गोलंदाज आहे. त्याचवेळी अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसानंतर कसोटी सामना खेळत आहे.