Download App

Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला लागली लॉटरी! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीम इंडियात मिळालं स्थान

Yashasvi Jaiswal replaced Ruturaj Gaikwad in Indian squad for World Test Championship : माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीपासून (Ravi Shastri) ते मोहम्मद कैफपर्यंत (Mohammad Kaif) सगळेच यशस्वी जयस्वालला टीम इंडियात स्थान देण्याबाबत बोलत होते. अशातच आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारा 21 वर्षीय क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालचे (Cricketer Yashasvi Jaiswal) नशीब फळफळले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन फायनल (WTCFinal)साठी भारतीय क्रिकेट संघात यशस्वी जयस्वालची निवड करण्यात आली.

आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी टीम इंडियामध्ये ऋतुराज गायकवाडच्या जागी यशस्वी जैस्वालचा स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला. ऋतुराज हा 3 जून ला लग्नबंधनात अडकणार आहेत, 3-4 जून रोजी लग्न होणार असल्याची माहिती त्याने BCCI ला दिली. त्यामुळे आता यशस्वी जयस्वालला बोर्डाकडून भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

संघ व्यवस्थापनाने यशस्वीला लाल चेंडूने सराव करण्यास सांगितले आहे. त्याच्याकडे आधीच व्हिसा आहे. अशा स्थितीत तो येत्या काही दिवसांत इंग्लंडला रवाना होणार आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या या युवा फलंदाजाने आयपीएल 2023 मध्ये 14 डावात 625 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्याने प्रथम श्रेणी स्पर्धेतील 5 सामन्यात 404 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 80 आहे.

New parliament : नव्या संसदेतून पीएम मोदींनी दिला 25 वर्षांचा रोडमॅप; म्हणाले, भारताला जर..

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित WTCFinal चा सामना लंडनमधील ‘द ओव्हल’ येथे खेळवल्या जाणार आहे. हा सामना 7 जून 2023 पासून इंग्लंडमध्ये खेळवला जाईल. त्यामुळं आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर कोणाचं नाव कोरल्या जाणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकीपर) .

स्टँडबाय प्लेअर :
यशस्वी जयस्वाल, मुकेशकुमार, सूर्यकुमार यादव.

Tags

follow us