Download App

Sachin Tendulkar Birthday: सचिनचे केवळ क्रिकेटमध्येच नाही तर या खेळातही प्रभुत्व, युवराजने केला खुलासा

  • Written By: Last Updated:

Sachin Tendulkar Birthday:  भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिनवर ‘आयुष्याचे अर्धशतक’ पूर्ण केल्याबद्दल जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, सचिनसोबत भारताला 2011 मध्ये विश्वविजेता बनवणाऱ्या युवराज सिंगने मास्टर ब्लास्टरबाबत मोठा खुलासा केला आहे. युवराजने सांगितले की, सचिनने केवळ क्रिकेटच नाही तर टेबल टेनिस या खेळातही प्रभुत्व मिळवले आहे.

इंग्लंडविरुद्धचे शतक खास होते

सचिनच्या वाढदिवसानिमित्त युवराजने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सचिनसोबत खेळलेल्या संस्मरणीय खेळीचा उल्लेख केला आहे. युवीने सचिनचे इंग्लंडविरुद्ध चेन्नईतील शतक सर्वात खास असल्याचे वर्णन केले आहे.

युवराज म्हणाला, “इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना जिंकणे हा खूप खास क्षण होता. त्यावेळी 26/11 चा हल्ला झाला होता . त्याने शतक झळकावले आणि मी त्याला उचलून घेत आनंद साजरा केला. सचिनने या खेळीचे श्रेय दहशतवादी हल्ल्यांत जखमी झालेल्यांना समर्पित केले.

भारतीय क्रिकेट संघातील ‘हे’ दोन खेळाडू अपघातातून थोडक्यात बचावले

सचिनने युवीची बॅट खिळ्याने फिक्स केली होती

व्हिडीओमध्ये युवराजने सांगितले की, सचिन तेंडुलकरने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याची तुटलेली बॅट खिळ्याने फिक्स केली होती. तो म्हणाला, “2011 च्या विश्वचषकादरम्यान माझी बॅट पूर्णपणे तुटली होती. आम्ही नागपुरात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत होतो.

सचिन टेबल टेनिसचाही स्टार खेळाडू

युवराज सिंगने सांगितले की, क्रिकेटशिवाय सचिन तेंडुलकरने टेबल टेनिस या खेळातही प्रभुत्व मिळवले आहे. तो म्हणाला, “तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी टेबल टेनिसमध्ये सचिनला हरवू शकत नाही.” विशेष म्हणजे, युवराज सिंग सचिनला आपला आदर्श मानतो आणि मास्टर ब्लास्टरने युवीला त्याच्या कारकिर्दीत खूप मदत केली होती. युवराज त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील खडतर टप्प्यातून जात असताना सचिनचा सल्ला त्याला उपयोगी पडला होता

 

Tags

follow us