ZIM vs AFG: तीन T20I मालिकेच्या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानला (ZIM vs AFG) धक्का देत रोमांचक सामन्यात 4 विकेटने विजय मिळावला आहे. पहिल्या सामन्यात 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने (Zimbabwe) शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. हरारे क्रिकेट क्लबमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने (Afghanistan) प्रथम फलंदाजी करताना 144 धावा केल्या होत्या.
नाणेफेक जिंकून अफगाणिस्तान प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र अफगाणिस्तानची सुरूवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये स्टार फलंदाज गुरबाज आऊट झाला आणि त्यानंतर अफगाणिस्तानने 58 धावांत पाच गडी गमावले. मात्र त्यानंतर करीम जनात आणि मोहम्मद नबी शानदार फलंदाजी करत या सामन्यात अफगाणिस्तानचा कमबॅक केला. करीम जनातने 49 चेंडूत 54 धावा केल्यानंतर नाबाद राहिला तर नबीने 27 चेंडूत 44 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानने 6 गडी गमावून 144 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून नागरवाने तीन विकेट घेतले.
तर दुसरीकडे या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरूवात देखील खराब झाली. झिम्बाब्वे पहिला विकेट 11 धावांवर गमावला. त्यानंतर बेनेट आणि मायर्सने शानदार भागीदारी करत झिम्बाब्वेला सामन्यात परत आणले. ब्रायनने 49 चेंडूत 49 धावा केल्या तर मायर्सने 32 धावांची खेळी खेळली.
Zimbabwe win a last-ball thriller to take a 1-0 lead in the series ⚡#ZIMvAFG #VisitZimbabwe 📝 https://t.co/EjMJE3pB5B pic.twitter.com/DyCYkTNKPb
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 11, 2024
नवीनच्या षटकात सामना बदलला
15 व्या ओव्हरमध्ये नवीन उल हकनने 6 वाइड आणि नो-बॉलसह 13 चेंडूंचे ओव्हर टाकले आणि 19 धावा दिल्या. त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये झिम्बाब्वेला विजयासाठी 11 धावांची गरज होती. मुसेकिवाने पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि पुढच्या दोन चेंडूंवर दोन – दोन धावा घेतल्या. चौथा चेंडू डॉट झाला आणि पाचव्या चेंडूवर दोन धावा आल्या.शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत झिम्बाब्वेने 4 विकेट्सने सामना जिंकला.
अदिती सैगलच नविन गाणं ‘10kmh’ आणि 2024 चं ऑक्सफोर्ड वर्ड ऑफ द ईयर ‘ब्रेन रॉट’ यांचा खास कनेक्शन!
तीन सामन्यांची या मालिकेत झिम्बाब्वेने 1-0 अशी आघाडी घेतली होती. याआधी पाच वर्षांपूर्वी झिम्बाब्वेने अफगाणिस्तानला तिरंगी मालिकेत पराभूत केले होते. त्या सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला होता.