अफगाणिस्तानने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सीरिजही जिंकली

अफगाणिस्तानने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सीरिजही जिंकली

AFG vs SA : अफगाणिस्तानच्या क्रिकेट (AFG vs SA) संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला. अफगाणिस्तानचा हा सलग दुसरा विजय (Afghanistan) होता. या विजयासह अफगाणिस्तानने 2-0 अशा फरकाने मालिकाही जिंकली. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना अफगाणिस्तानने 177 धावांनी जिंकला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीत राशिद खान (Rashid Khan) चमकला. त्याने 5 विकेट घेत आफ्रिकेच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं.

अफगाणिस्तानचा आफ्रिकेला दणका! पहिल्याच सामन्यात सहा विकेट्सने विजय

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हर्समध्ये 311 धावा केल्या होत्या. गुरबाजने शतकी खेळी केली. रहमतने अर्धशतक केले. त्याने 66 चेंडूत 50 धावा केल्या. अफगाणिस्तानने आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणे मात्र आफ्रिकेच्या फलंदाजांना शक्य झाले नाही. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर त्यांची फलंदाजी ढेपाळली आणि अफगाणिस्तानने तब्बल 177 धावांना आफ्रिकेचा पाडाव केला.

दक्षिण आफ्रिकेच्या फक्त 134 धावा काढता आल्या. एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. कर्णधार टेम्बा बावुमाने सर्वाधिक 34 धावा केल्या. टोनी डी जोर्जीने 31, रीज हेंड्रिक्सने 17 तर एडन मार्करमला 21 धावा करता आल्या. अशा पद्धतीने आफ्रिकेचा संपूर्ण संघ 34.2 ओव्हर्समध्येच ऑल आउट झाला.

अफगाणिस्तानकडून फिरकी गोलंदाज राशिद खान आणि नांगेलिया खरोटे या दोघांनी चमकदार कामगिरी केली. राशिद खानला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. त्याने 9 ओव्हर्समध्ये फक्त 19 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. खरोटेने 6.2 ओव्हरमध्ये 26 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. ठराविक अंतराने आफ्रिकेचे फलंदाज बाद होत राहिले. एकालाही मोठी खेळी करून डाव सावरता आला नाही. या पराभवानंतर आफ्रिकेने मालिकाही गमावली आहे. या मालिकेत आता फक्त एक सामना बाकी राहिला आहे.

ऑस्ट्रेलियाचा वैरी अन् T20 मधला मास्टर; अफगाणिस्तानच्या विजयाचे मैदानाबाहेरचे हिरो

follow us
  • fb
  • instagram
  • youtube