श्रीलंका विश्वचषक 2023 साठी पात्र ठरला आहे. दासुन शनाकाच्या संघाने झिम्बाब्वेचा 9 गडी राखून पराभव करून विश्वचषक 2023 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी 166 धावांचे लक्ष्य मिळाले होते. श्रीलंकेच्या संघाने 32.1 षटकात 1 विकेट गमावत 169 धावा करत सामना जिंकला. तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक हारल्यानंतर झिम्बाब्वे प्रथम फलंदाजीला उतरला आणि 32.2 षटकात 165 धावा झाल्या. (zimbabwe-sri-lanka-super-sixes-match-4-sl-vs-zim-dasun-shanaka-team-qualify-for-world-cup-2023)
सामन्याचा लेखाजोखा
झिम्बाब्वेसाठी केवळ कर्णधार शॉन विल्यम्सने पन्नास धावांचा टप्पा ओलांडला. याशिवाय उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. झिम्बाब्वेचा कर्णधार शॉन विल्यम्सने 57 चेंडूत 56 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. श्रीलंकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर महिश तिक्ष्णा हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. महिष तिक्ष्णाने 8.2 षटकात 25 धावा देत 4 खेळाडूंना आपला बळी बनवले. तर दिलशान मधुशंकाला 3 यश मिळाले. याशिवाय महिथा पाथिरानाने 2 बळी घेतले. दासुन शनाकाने 1 बळी आपल्या नावावर केला. महिष तिक्ष्णाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
SAFF Championship : भारताचा रोमहर्षक सामन्यात शानदार विजय; टीम इंडियाचं चॅम्पियनशिपचं लक्ष्य
पथुम निशांकने नाबाद शतक झळकावले
झिम्बाब्वेच्या 165 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाने 32.1 षटकात 1 गडी गमावत 169 धावा करत सामना जिंकला. श्रीलंकेकडून सलामीवीर पथुम निशांकने शानदार शतक झळकावले. या फलंदाजाने 102 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार मारले. तर कुसल मेंडिस 42 चेंडूत 25 धावा करून नाबाद परतला. तर दिमुथ करुणारत्नेने बाद होण्यापूर्वी 56 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेसाठी एकमेव यश रिचर्ड नगारावाला मिळाले.