Zimbabwe World Record of Winning by Highest Runs Margin : झिम्बाब्वे संघाने पहिल्या टी 20 सामन्यात सर्वात (Zimbabwe) मोठी धावसंख्या उभारली. नंतर क्रिकेटमधील सर्वात मोठा विजयही साकारला. या विजयासह झिम्बाब्वेने क्रिकेट जगतात मोठे रेकॉर्डही स्थापित केले आहे. टी 20 वर्ल्ड सब रिजनल आफ्रिका क्वालिफायर ग्रुप बी 2024 मध्ये झिम्बाब्वेने गांबिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कमालच केली. या सामन्यात झिम्बाब्वेने मोठ्या फरकाने सामना जिंकला. टी 20 क्रिकेटमध्ये इतक्या मोठ्या फरकाने एखादा संघ विजय मिळवत असेल असे सहसा घडत नाही.
गांबिया विरुद्ध झिम्बाब्वेने तब्बल 290 धावांनी विजय साकारला. टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना वीस ओव्हर्समध्ये तब्बल 344 धावा केल्या होत्या. टी 20 क्रिकेट इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या राहिली. याआधी नेपाळ संघाने 314 धावांचे रेकॉर्ड केले होते. झिम्बाब्वेने हे रेकॉर्डही मोडून काढले.
आयटी अन् मॅकेनिकल इंजिनिअर, UPSC ही केली क्रॅक.. भारताचे क्रिकेटर्स शिक्षणातही अव्वल
झिम्बाब्वे संघाचा कर्णधा सिकंदर रजाने धुवाधार फलंदाजी केली. त्याने 43 चेंडूत 7 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने 133 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 309.30 इतका जबरदस्त राहिला. या दरम्यान रजाने फक्त 33 चेंडूत शतक पूर्ण केले. टी 20 क्रिकेटमध्ये हे दुसरे सर्वात वेगवान शतक होते.
झिम्बाब्वेच्या फलंदाजीत विकेटकीपर फलंदाज तदिवानाशे मरुमणि याने 19 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. त्याचाही स्ट्राइक रेट 326.32 इतका राहिला. याशिवाय क्लाइव मदांदेने 17 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 53 धावा केल्या. सलामीचा फलंदाज ब्रायन बेनेट 26 चेंडूत 7 चौकार आणि एक षटकारासह 50 धावा केल्या.
यानंतर झिम्बाब्वेच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गाम्बिया संघाची अवस्था अतिशय खराब राहिली. गांबियाचा अख्खा संघ 14.4 ओव्हर्समध्ये फक्त 54 धावांवर ऑल आऊट झाला. फक्त एका फलंदाजान दोन अंकी धावसंख्या गाठली.
IND vs ZIM : भारतीय संघाचा विजयी चौकार, शेवटच्या T20 मध्ये झिम्बाब्वेला दिली 42 धावांनी मात