Download App

भूकंपाने म्यानमारमध्ये हाहाकार माजवला… आतापर्यंत 144 जणांचा मृत्यू, 700 हून अधिक जखमी

114 People Killed In Myanmar Earthquake : म्यानमारमध्ये (Myanmar) आज 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झालाय. या भुकंपामुळे मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय. या आपत्तीत आतापर्यंत 144 जणांचा मृत्यू झाला. तर 732 जण जखमी झाल्याचं वृत्त मिळतंय. ही संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे, ही माहिती म्यानमारच्या लष्करी सरकारच्या प्रमुखांनी (जुंता) दिली आहे. भूकंपामुळे (Myanmar Earthquake) अनेक इमारती, पूल आणि ऐतिहासिक इमारती कोसळल्या आहेत. यामुळे अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले (Earthquake) आहेत.

अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, भूकंपाचे केंद्र मंडाले शहरापासून 17.2 किमी अंतरावर होते, तिथे सुमारे 15 लाख लोक राहतात. मंडाले व्यतिरिक्त, भूकंपाचे तीव्र धक्के सागाइंग, नायपिडॉ आणि इतर भागातही जाणवले. म्यानमारच्या सत्ताधारी लष्करी सरकारने (जंटा) सहा राज्यांमध्ये आणीबाणी लागू केली आहे. आंतरराष्ट्रीय मदतीचे आवाहन केले आहे, परंतु अनेक प्रभावित भागात पोहोचणे कठीण असल्याने विध्वंसाचे खरे चित्र अजून समोर आलेले नाही.

मोठी बातमी! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, केंद्र सरकारचा निर्णय

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या छायाचित्रांमध्ये कोसळलेल्या इमारती, भेगा पडलेल्या रस्ते आणि उद्ध्वस्त घरे दिसत आहेत. म्यानमारसह थायलंडलाही भूकंपाचा धक्का बसला. बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका गगनचुंबी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आठ जणांचा मृत्यू झाला. डझनभर कामगारांना वाचवण्यात आलंय. सुमारे 117 लोक अजूनही अडकले आहेत, मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे. थायलंडमध्ये दुसऱ्या ठिकाणी आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

म्यानमारच्या सरकारी माध्यमांनुसार, भूकंपामुळे पाच शहरे आणि गावांमध्ये इमारती कोसळल्या. तसेच यांगून-मंडाले एक्सप्रेसवेवरील एक रेल्वे पूल आणि एक रस्ता पूल कोसळला. शक्तिशाली भूकंपानंतर मंडाले येथील ऐतिहासिक 90 वर्षे जुना अवा पूल इरावती नदीत कोसळला. म्यानमारमधून समोर येणाऱ्या अनेक फोटो आणि व्हिडिओंमध्ये कोसळलेला घड्याळ टॉवर आणि ऐतिहासिक मंडाले पॅलेसचे काही भाग खराब झालेले दिसत आहेत.

‘मनसेची साथ मिळाली… अब झुकेगा नही साला’, रणजित कासलेंनी थोपटले दंड

रेड क्रॉसने धरणांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस एजन्सीने म्यानमारमधील प्रमुख धरणांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधांचे गंभीर नुकसान झाल्याची पुष्टी केली आहे, यामध्ये देशाच्या वायव्य भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. रेडक्रॉसच्या वरिष्ठ अधिकारी मेरी मॅनरिक म्हणाल्या की, रस्ते, पूल आणि सार्वजनिक इमारतींसह सार्वजनिक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.

 

follow us