Murder of Woman and Children In Pune District : पुणे जिल्ह्यातील शिरुर रांजणगावच्या हद्दीत एका महिलेची तीच्या दोन मुलांसह निर्घृण हत्या केल्याचं समोर आलंय. हत्येनंतर तीघांचेही मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Woman) मात्र, पावसामुळे मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाले आहेत. रांजणगाव मधील खंडाळा माथ्याजवळ हे तिन्ही मृतदेह आढळून आले आहेत. हत्या झालेल्या महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षं असुन एका मुलाचा वये अंदाजे चार वर्षे तर दुसऱ्या बाळाचं वय अंदाजे दीड वर्षे आहे.
तिनं कोणाचा खून केलाय का? असं विचारत सुप्रीम कोर्टानं दिला पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन
मृत महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे असावे असं सांगितलं जात आहे. तर तिच्या मुलांपैकी एकाचे वय चार वर्षे आणि दुसऱ्याचं वय दीड वर्ष असल्याची प्राथमिक माहिती आहे. या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. रांजणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या अमानुष कृत्यामागचे कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे. तसंच, स्थानिकांकडूनही माहिती घेतली जात आहे.
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या घटनेनं हृदय सुन्न झालं असून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांना अर्धवट अवस्थेत जळलेले मृतदेह मिळाले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी कृत्य वाढताना दिसत आहेत.