जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर! अमेरिकेने 20 हुथी बंडखोरांना एअरस्ट्राईकने संपवलं

America ने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये वीस होती बंडखोरांचा मृत्यू झाला आहे. तसेच इराणला देखील यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी खडक इशारा दिला आहे.

Yr Paragraph Text

Yr Paragraph Text

America kills 20 Houthi rebels in airstrike : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्धापासून इराण समर्थित हुथी बंडखोर लाल समुद्र आणि एडनच्या आखातातून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले करत आहेत. याआधी बंडखोरांकडून फक्त इस्त्रायलची जहाजे टार्गेट केली जात होती. आता मात्र या बंडखोरांनी अन्य देशांच्या जहाजांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या लाल समुद्रावर या बंडखोरांनी हल्ला केला होता याला चोख उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिकेने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये वीस हुथी बंडखोरांचा मृत्यू झाला आहे. तसेच या बंडखोरांना पाठिंबा देणाऱ्या इराण या देशाला देखील यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा दिला आहे.

सतीश भोसलेचं घर कोणत्या नियमाने पाडलं; खोक्याच्या कुटुंबाला भेटत सुरेश धसांचा वनविभागाला सवाल

दरम्यान अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या हल्ल्यानंतर हुथी बंडखोरांच्या म्होरक्याकडून देखील या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. हुथी बंडखोरांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की, अमेरिकेच्या या आक्रमक हल्ल्याला आमच्याकडूनही योग्य उत्तर दिलं जाईल. या हल्ल्यासाठी तयार आहोत. त्यामुळे आता जगामध्ये एकीकडे नुकत्याच थांबलेल्या रशिया-युक्रेन आणि इजराइल-हमास या युद्धानंतर आक्रमक झालेली अमेरिका पाहता जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर तर येऊन ठेपले नाही ना? अशा चर्चा जगभरात सुरू झाल्या आहेत.

कोण आहेत हूथी बंडखोर?

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध अद्याप कायम आहे. गाझामध्ये लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना पकडण्यसाठी इस्त्रायलने जंगजंग पछाडले आहे. पण त्याचवेळी या युद्धामुळे हूथी बंडखोरही आक्रमक झाले आहेत. 1990 मध्ये येमेनचे तत्कालीन अध्यक्षांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली होती.

Exit mobile version